वाघांचे दात विकणे आहे! उमरेडमध्ये पाच आरोपी जेरबंद, वनविभागानं रचला सापळा

| Updated on: Nov 24, 2021 | 3:56 PM

वाघांचे दात विकणाऱ्या पाच आरोपींना वनविभागानं उमरेड बसस्थानकाजवळ जेरबंद केलं. वाघांची नख आणि दातही जप्त करण्यात आलेत.

वाघांचे दात विकणे आहे! उमरेडमध्ये पाच आरोपी जेरबंद, वनविभागानं रचला सापळा
उमरेड येथे अटक करण्यात आलेल्या आरोपींसह वनविभागाचे अधिकारी.
Follow us on

नागपूर : उमरेड बसस्थानकाजवळ वाघांच्या दातांची विक्री होत असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली. दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्राच्या पथकाद्वारे सापडा रचण्यात आला. लगेच तीन आरोपींना अटक करण्यात आली. चौकशीनंतर माहितीच्या आधारी मेळघाट सायबर सेलच्या मदतीनं आणखी दोन आरोपी सापडलेत.

वाघांचे दात विकणाऱ्या पाच आरोपींना वनविभागानं उमरेड बसस्थानकाजवळ जेरबंद केलं. वाघांची नख आणि दातही जप्त करण्यात आलेत.

अशी आहेत आरोपींची नावे

खडकळा येथील ताराचंद महादेव नेवारे (41), वाढोणा येथील दिनेश कवटू कुंभले (30) व अजय राजू भानारकर (24), सोनपूर (तुकुम) येथील प्रेमचंद वाघाडे (50), नागभिड तालुक्यातील खडकळा येथील राजू कुळमेथे (38) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वन्यजीव (संरक्षण) अधिनियमाअंतर्गत आरोपींविरुद्ध गु्न्हा नोंदविण्यात आलाय. आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता उमरेड उपविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक एन. जी. चांदेवार यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे राजू कुळमेथे हा आरोपी व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे. तर, ताराचंद नेवारे हा पीआरटीचा सदस्य आहे.

यांनी केली कारवाई

ही कारवाई नागपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक श्री. पी. कल्याणकुमार, उपवनसंरक्षक डॉ. भारती सिंह हाडा यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक एन. जी. चांदेवार, वनपरिक्षेत्र अधिकारी कोमल गजरे, श्री. चौगुले, श्री. अगळे, श्री. भिसे, सर्व वनपाल, श्री. कोपले, श्री. नरवास, श्री. पेंदाम, श्री. श्रीरामे, श्री. हेडाऊ, सर्व वनरक्षक यांनी केली. तपास सहाय्यक वनसंरक्षक एन. जी. चांदेवार करीत आहेत.

जप्त करण्यात आलेले वाघाचे दात आणि नखे

Vedio छोटू भोयर यांना भोवणार राष्ट्रवादी, शिवसेनेची नाराजी?, राष्ट्रवादीचे नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांची वरिष्ठांच्या आदेशाकडे नजर

Nagpur -मतदार पळवापळवीची भीती, विधान परिषद निवडणूक, नगरसेवकांवर ठेवणार पाळत