AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नामर्द, घरफोडे, सत्तेची मस्ती… उद्धव ठाकरे यांचा अमरावतीच्या सभेतून भाजपवर जोरदार हल्ला

अरे भुजबळ हे मातोश्रीवर आले होते. बाळासाहेबांना भेटले होते. सर्व मिटलं होतं. जर बाळासाहेबांना अटक करणाऱ्या भुजबळाच्या मांडीला मांडी लावून मी बसलो होतो.

नामर्द, घरफोडे, सत्तेची मस्ती... उद्धव ठाकरे यांचा अमरावतीच्या सभेतून भाजपवर जोरदार हल्ला
uddhav thackeray Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 10, 2023 | 1:56 PM
Share

अमरावती : शिवसेनेतील फुटीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच विदर्भाच्या दौऱ्यावर आले आहेत. उद्धव ठाकरे दोन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. काल यवतमाळमध्ये शिवसैनिकांशी संवाद साधल्यानंतर उद्धव ठाकरे आज अमरावतीत आले आहेत. अमरावतीत त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी भाजपचा उल्लेख नामर्द, घरफोडे आणि घरचेभेदी असा उल्लेख केला. तसेच भाजपला सत्तेची मस्ती आल्याची घणाघाती टीकाही त्यांनी केली.

मी घरी बसून होतो. मान्य आहे. पण मी कुणाची घरं फोडली नाही. घर फोडे तुम्ही आहात. मी घरी बसून जी कामं केली, ती तुम्हाला घरं फोडून करता आली नाही. तुम्हाला दारं उरली नाही. तुम्हाला कोणी विचारत नाही. त्यामुळेच शासन आपल्या दारी सुरू आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यक्रमात गर्दीसाठी बसवलं जात आहे. ही वेळ का आली तुमच्यावर? काम केली असती तर असे कार्यक्रम घेण्याची वेळ तुम्हाला वेळ आली नसती, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

फोडाफोडी सुरू आहे

तुम्हाला माणसं विकत घेता येतात. आमदार विकत घेता येतात असं मी पाहतोय. पण आदिवासी भागातील माणसं वाचवा ना? तुम्हाला मतदारही विकत घ्यायची गरज पडणार नाही. फक्त फोडाफोडी सुरू आहे. सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून माझं नाव येत होतं. जगात नरेंद्र मोदी नंबर एकचे पंतप्रधान आहेत. तरीही इतर पक्ष का फोडत आहात. कशासाठी?, असा सवाल त्यांनी केली.

भाजपला सत्तेची मस्ती

तुमच्यावर ही वेळ का आली? मस्ती आणि आत्मविश्वास हे दोन शब्द आहेत. यातील भाजपला सत्तेची मस्ती आली आहे. पण त्यांना त्यांच्या ताकदीचा आत्मविश्वास नाही. निवडून येऊच शकत नाही ही धाकधूक आहे. त्यामुळेच समोर कुणालाच ठेवत नाही. मर्दाची अवलाद असाल तर सरकारी यंत्रणा बाजूला ठेवा आणि मैदानात या, असं आव्हानच त्यांनी दिलं. राजकारणातील नामर्द तुम्ही. तुमची ताकद कधी होती?, असा सवाल त्यांनी केला.

अरे मिटलं होतं सर्व

बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसल्यानेच आम्ही बाहेर पडल्याचा दावा शिंदे गटाचे लोक करत होते. अरे भुजबळ हे मातोश्रीवर आले होते. बाळासाहेबांना भेटले होते. सर्व मिटलं होतं. जर बाळासाहेबांना अटक करणाऱ्या भुजबळाच्या मांडीला मांडी लावून मी बसलो होतो. तर तुम्ही भुजबळांच्या कशाला काय लावून बसला आहात? म्हणजे मांडीला मांडी, हाताला हात, डोक्याला डोकं. असं म्हणायचं होतं मला, असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी काढताच एकच खोखो झाला.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?