Godrej Property : आता घरांची ‘समृद्धी’, ऑरेंज सिटीत गोदरेजमुळे साकारणार टुमदार बंगले

Godrej Property : नागपूरकरांचे समृद्धी महामार्गालगतचं टुमदार घरांचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. गेल्यावर्षी गोदरेज प्रापर्टीने जमिनीत गुंतवणूकीची घोषणा केली होती. त्यानुसार नागपूर शहरात अत्यंत मोक्याच्या ठिकाणी त्यांनी जमीन संपादित केली आहे. या लोकेशनवरुन सर्वच ठिकाणी पोहचणे श्रेयस्कर असेल.

Godrej Property : आता घरांची 'समृद्धी', ऑरेंज सिटीत गोदरेजमुळे साकारणार टुमदार बंगले
Follow us
| Updated on: Sep 29, 2023 | 3:36 PM

नवी दिल्ली | 29 सप्टेंबर 2023 : गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड (Godrej Properties Ltd (GPL)) ही भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. आज, त्यांनी नागपूरमध्ये 109 एकर जागा खरेदी केल्याचे जाहीर केले. ही जमीन संपादित करण्यात आली आहे. गेल्या वर्षी कंपनीने नागपूरमध्ये मोक्याच्या ठिकाणी गुंतवणुकीची घोषणा केली होती. ही जागा रहिवाशी वापरासाठी आहे. त्यासाठी प्लॉटिंग करण्यात येईल. 2.2 दशलक्ष चौरस फुटावर हा प्रकल्प साकारणार आहे. कनेक्टिव्हीटी असल्याने या जागेला सोन्याचा भाव येणार हे वेगळं सांगायला नको. हे लोकेशन सर्वच ठिकाणी पोहचण्यासाठी अत्यंत मोक्याचं राहणार आहे. या घडामोडींमुळे कंपनीचा शेअर वधारला आहे.

मोक्याचे ठिकाण

हे ठिकाण मोक्याचे आहे. ही जागा नागपूर विमानतळालगत आहे. समृद्धी महामार्ग अगदी हाकेच्या अंतरावर आहे. मिहानचा सेझ प्रकल्प जवळ आहे. मुंबई-कोलकत्ता महामार्गाची कनेक्टिव्हिटी भेटणार आहे. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ पण येथून जवळ आहे. कनेक्टिव्हीटी वाढल्यामुळं राहण्याच्या जागेचीही मागणी वाढणार आहे. याठिकाणी महापालिकेच्या सोयी-सुविधा मिळतील. रुग्णालये, दवाखाने, शाळा, मॉल, किराणा दुकान हे पण हाकेच्या अंतरावर आहेत.

हे सुद्धा वाचा

मायक्रो मार्केट उभारणीत खारीचा वाटा

गोदरेज प्रॉपर्टीजचे एमडी आणि सीईओ गौरव पांडेय यांनी या प्रकल्पाचे महत्व सांगितले. हा प्रकल्प नागपूर सारख्या देशाच्या मध्यवर्ती शहरासाठी मायक्रो मार्केट उभारण्यात खारीचा वाटा उचलेल असे ते म्हणाले. येथील प्लॉट खरेदीदारांसाठी सुविधाजनक असतील. येथील गुंतवणूकदारांसाठी हा भविष्यासाठी उत्तम प्रकल्प ठरेल, असे त्यांनी सांगितले.

शेअर वधारला

गोदरेज प्रॉपर्टीजनं नागपुरात प्रकल्पासाठी जमीन संपादित केल्याने या ठिकाणी सोन्याचा भाव मिळेल. ही गुंतवणूक रहिवाशांसाठी पण फायदेशीर ठरेल. गोदरेज प्रॉपर्टी लिमिटेड ही रिअल इस्टेटमधील अग्रगण्य कंपनी आहे. कंपनीचे मुख्य कार्यालय मुंबईत आहे. आदी गोदरेज यांनी 1990 मध्ये या कंपनीची स्थापना केली होती. ही कंपनी बाँबे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध आहे. कंपनीच्या घोषणेनंतर आज बाजारात कंपनीच्या शेअरमध्ये 2 टक्के उसळी दिसून आली. दुपारी 11:51 वाजता कंपनीचा शेअर 1,557.15 रुपयांवर होता.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.