बुद्धिबळपटू संकल्प गुप्ताचं जल्लोषात स्वागत, नागपुरातील 18 वर्षांचा संकल्प झाला ग्रँडमास्टर

| Updated on: Nov 11, 2021 | 12:30 PM

नागपूर : ग्रॅंडमास्टर झालेल्या नागपुरातील १८ वर्षांचा बुद्धिबळपटू संकल्प गुप्ताचं रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत झालं. त्यानंतर पत्रकारांशी त्यानं संवाद साधला. २०२२ पर्यंत २६०० यलो रेटिंग मिळवू इच्छितो आणि त्यानंतर २७०० रेटिंगसह सुपर ग्रॅंडमास्टर व्हायचं, स्वप्न असल्याचं संकल्प गुप्तानं सांगितलं. संकल्पनं सर्बियातील तीन बुद्धिबळ स्पर्धांमध्ये २५०१ येलो रेटिंग संपादित केलंय. त्यामुळं त्याला भारताचा ७१ वा ग्रॅंडमास्टर […]

बुद्धिबळपटू संकल्प गुप्ताचं जल्लोषात स्वागत, नागपुरातील 18 वर्षांचा संकल्प झाला ग्रँडमास्टर
“2022 पर्यॅत तो 2600 यलो रेटिंग मिळवू इच्छितो आणि त्यानंतर 2700 रेटिंगसह ‘सुपर ग्रॅंडमास्टर’ व्हायचंय, स्वप्न असल्याचं बुद्धीबळपटू संकल्प गुप्ता यांनी सांगितलं.
Follow us on

नागपूर : ग्रॅंडमास्टर झालेल्या नागपुरातील १८ वर्षांचा बुद्धिबळपटू संकल्प गुप्ताचं रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत झालं. त्यानंतर पत्रकारांशी त्यानं संवाद साधला. २०२२ पर्यंत २६०० यलो रेटिंग मिळवू इच्छितो आणि त्यानंतर २७०० रेटिंगसह सुपर ग्रॅंडमास्टर व्हायचं, स्वप्न असल्याचं संकल्प गुप्तानं सांगितलं.

संकल्पनं सर्बियातील तीन बुद्धिबळ स्पर्धांमध्ये २५०१ येलो रेटिंग संपादित केलंय. त्यामुळं त्याला भारताचा ७१ वा ग्रॅंडमास्टर होण्याचा मान मिळवला. त्यानं नागपूरच नाही तर महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. 2008 पासून संकल्पनं बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. छोट्या-छोट्या स्पर्धांमध्ये तो भाग घ्यायचा. नागपूरसह विदर्भात खेळाच्या अनेक स्पर्धा होत होत्या. त्यामधून त्याचा चांगला सराव झाला. त्यानंतर त्यानं पुढं झेप घेतली. सर्बियातील अरांदजेलोवाक शहरात झालेल्या स्पर्धेत साडेसात गुणांची कमाई त्यानं केली.

संयमी वृत्तीचे फळ

संकल्पचे वडील संदीप गुप्ता सांगतात, जळगावला स्पर्धेसाठी घेऊन गेलो असता स्पर्धा हरल्यानंतर तो रडायचा. त्यानंतर आम्ही त्याची समजुत काढली. तेव्हापासून त्याच्यात जिंकण्याची वृत्ती जागी झाली. तर आई सुमन म्हणते, संकल्प नेहमी विजयाच्या निर्धाराने खेळतो. त्याच्यात संयमी वृत्ती असल्यानं हे फळ त्याला मिळालंय.

महापौरांनी घरी जाऊन केला सत्कार

महापौर दयाशंकर तिवारी यांनी संकल्पचा त्याच्या बरेजिया येथील घरी जाऊन महापालिकेच्या वतीनं सत्कार केला. यावेळी क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने उपस्थित होते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीसुद्धा संकल्पला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिवाय वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथ आनंद यांनीही त्याचे कौतुक केलंय.

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, संकल्प गुप्ता भारताचा 71 वा ग्रँडमास्टर, नागपुरात आगमन होताच पुढचं लक्ष्य सांगितलं!

नागपुरात नाल्यात गेलेल्या मगरीला शोधण्यासाठी कॅमेरा ट्रॅप, वन विभागाकडून खबरदारीचं आवाहन