AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur | पाण्यासाठी करावी लागते धावाधाव; मनपाने काय केली व्यवस्था जाणून घ्या

डायड्रंट झाल्यास गरजेनुसार अग्निशमन बंबांना पाणी उपलब्ध होईल. त्यामुळं होणारे नुकसान कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Nagpur | पाण्यासाठी करावी लागते धावाधाव; मनपाने काय केली व्यवस्था जाणून घ्या
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Jan 06, 2022 | 7:05 AM
Share

नागपूर : एखादी आगीची घटना घडल्यास अग्निशमन बंबाला पाणी भरण्याकरिता धावाधाव करावी लागते. पण, ही धावाधाव आता संपणार आहे. नागपूर शहराच्या 116 महत्त्वपूर्ण ठिकाणी लवकरच हायड्रंट लावण्यात येणार आहेत. यामुळं आगीची घटना घडलेल्या ठिकाणीही जवळील हायड्रंटमधून पाणी भरणे शक्य होईल. शहर सुरक्षितेच्या दृष्टिकोनातूनही हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे.

116 ठिकाणी हायड्रंट बसविण्याचा प्रस्ताव

महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यासाठी 99 लाखांवर खर्च अपेक्षित आहे. यापूर्वीदेखील याबाबतचे प्रस्ताव स्थायी समितीकडून मंजूर करण्यात आले. 1947 मध्ये नागपूर शहरात जवळपास महत्त्वपूर्ण ठिकाणी एक हजारांवर हायड्रंट बसविण्यात आले होते. त्या काळात या हायड्रंटवर 24 तास पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली होती. शहरात आगीची घटना घडल्यास अग्निशमन बंबांना पाणी भरणे सोयीस्कर व्हात असे. यातून मोठ्या आगीच्या घटनांवरही लवकर नियंत्रण मिळविले जात होते. यातून मोठे नुकसान वाचविणे शक्य होत होते. पण, ब्रिटिशांचा हा वारसा महापालिकेने सांभाळला नाही. आता शहरात 116 ठिकाणी हायड्रंट बसविण्याचा प्रस्ताव पारित केलाय. हायड्रंटचे महत्त्व माहिती असतानाही महापालिका याबाबत कृती करू शकली नाही.

शहरात उरले फक्त 9 हायड्रंट

शहरात आता केवळ 9 हायड्रंट उरले आहेत. कस्तूरचंद पार्कजवळील सेंट जोसेफ शाळा, रेल्वेस्टेशनलगत, विधान भवनाजवळ, महापालिकेच्या सदर हॉस्पिटलच्या बाहेर, रविभवन परिसर, टिळकनगर, इंदिरा गांधी रुग्णालय आणि काचीपुरा चौक (रामदासपेठ) आदी ठिकाणी हे हायड्रंट आहेत. अग्निशमन व जलप्रदाय विभागाने संयुक्त सर्वेक्षण करून हायड्रंटसाठी 116 ठिकाणे निश्‍चित केली होती. वेळोवेळी निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र, कंत्राटदारांचा प्रतिसाद मिळाला नाही. याकडेही महापालिकेने तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे. डायड्रंट झाल्यास गरजेनुसार अग्निशमन बंबांना पाणी उपलब्ध होईल. त्यामुळं होणारे नुकसान कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Biodiversity | जैवविविधता मंडळाची दशकपूर्ती; माहितीच्या संकलनाची बँक काय असते समजून घ्या

नागपूरच्या शहरी भागातील शाळा बंद, शाळांबाबत नियमावली काय? वाचा सविस्तर

Nagpur | घरीच तयार होत होती सुगंधी तंबाखू, पोलिसांनी टाकली धाड; धाडीत काय सापडलं?

Follow Us
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट...
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट याचिकाकर्त्यांनाच नोटीस; ED, CBI...
दिमागी नक्षलवाद: सोशल मीडियावर नवीन ट्रेंड, लाखोंनी केले फॉलो
दिमागी नक्षल पार्टीचा सोशल मीडियावर धुमाकूळ: पंतप्रधानांच्या शब्दातून झालेली ऑनलाईन चळवळ
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना दिले तातडीचे निर्देश... झारखंड विद्यार्थी
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना दिले तातडीचे निर्देश... झारखंड विद्यार्थी आंदोलनावर अखेर राहुल गांधींनी सोडलं मौन
दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! CM फडणवीस आणि पंतप्रधानांच्या भेटीत...
दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! CM फडणवीस आणि पंतप्रधानांच्या भेटीत नेमकं काय घडलं? मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! मनोज जरांगेंचे वडील त्यांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल;
मोठी बातमी! मनोज जरांगेंचे वडील त्यांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल; लेकाची प्रकृती खालावल्याचं कळताच...
नाशिकमधील जीवघेण्या खड्ड्यांमुळे ठाकरे सेनेचा महापालिकेवर भव्य मोर्चा
नाशिकमधील जीवघेण्या खड्ड्यांमुळे ठाकरे सेनेचा महापालिकेवर भव्य मोर्चा
चाळणी झालेल्या रस्त्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन; नाशिककरांसाठी..
चाळणी झालेल्या रस्त्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन; नाशिककरांसाठी संजय राऊत मैदानात, पहा व्हिडीओ
ज्याची भीती तेच... महाराष्ट्रातदेखील बिहार सारखं होणार, SIR बाबत
ज्याची भीती तेच... महाराष्ट्रातदेखील बिहार सारखं होणार, SIR बाबत बड्या नेत्याचा धक्कादायक दावा
मराठा आरक्षण आंदोलन: मनोज जरांगेंची ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी, सत्ता जाण्याची शक्यता
तुमचं सरकार पाडणार, मराठ्यांचा तळतळाट... मनोज जरांगे काडाडले,
तुमचं सरकार पाडणार, मराठ्यांचा तळतळाट... मनोज जरांगे काडाडले, पुर्ण 58 लाख...