Nagpur Crime | नागपुरात मुलानेच केली घरी चोरी; शौक भागविण्यासाठी आईचे दागिनेच लांबविले

| Updated on: May 15, 2022 | 4:01 PM

आईला दागिने दिसले नाही. घरी सर्वांना विचारले. पण, या मुलानं काही सांगितलं नाही. शेवटी ती माऊली पोलिसांत गेली. पोलिसांनी चौकशी केली. तिच्या मुलावर पोलिसांना संशय आला. त्यानेही शेवटी मीच चोरी केल्याचं कबुल केलं. आता तो पोलिसांच्या ताब्यात आहे.

Nagpur Crime | नागपुरात मुलानेच केली घरी चोरी; शौक भागविण्यासाठी आईचे दागिनेच लांबविले
नागपुरात मुलानेच केली घरी चोरी
Image Credit source: tv 9
Follow us on

नागपूर : स्वतःच्याच घरातच कोणी चोरी करू शकते. हा प्रकार ऐकायला अजब वाटत असला तरी अशा प्रकारची घटना नागपूरच्या वाठोडा पोलीस स्टेशन (Vathoda Police Station) हद्दीत घडली. आपल्याच घरातील आईचे सोन्या-चांदीचे दागिने मुलाने आपल्या शौक भागविण्याकरिता चोरी केले. मात्र आता तो पोलीस कोठडीत पोचला आहे. स्वतःचे शौक पूर्ण करण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. नागपुरातील एका मुलाने तर आपले शौक भागविण्यासाठी चक्क आपल्याच घरात आईच्या दागिन्यांची चोरी (Jewelry Theft) केली. आईला जेव्हा दागिन्यांची गरज पडली आणि तिने कपाटात बघितलं. तेव्हा दागिने घरात नव्हते. घरात चोरी झाली असावी या उद्देशाने आईने पोलिसात तक्रार (Police Complaint) दाखल केली.

आरोपी मुलाकडून मुद्देमाल हस्तगत

पोलिसांनी चोरीचा तपास सुरू केला. काय तर चक्क त्या आईचा मुलगाच चोर निघाला. पोलिसांनी घरातून राहता चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. अशी माहिती वाठोड्याच्या पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांनी दिली. या नवशिक्या चोराला कदाचित माहीत नसावं. चोरीच्या घटनेनंतर पोलिसांच तपास चक्र फिरेल. त्यात आपण स्वतः गोवलं जाऊ. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली. स्वतःच्या घरात आपली मालमत्ता सुरक्षित नाही. घरातील मेंबर अशा प्रकारचे कृत्य करू शकतात, का असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित व्हायला लागलेत.

पोलिसांनाच आला संशय

घरी दागिने ठेवले होते. मुलाचा खर्च वाढला होता. नेहमी तो आईला पैसे मागायचा. पण, कारण काय सांगणार. त्यामुळं त्यानं शक्कल लढवली. घरचे दागिने चोरायचे ठरविले. आईला दागिने दिसले नाही. घरी सर्वांना विचारले. पण, या मुलानं काही सांगितलं नाही. शेवटी ती माऊली पोलिसांत गेली. पोलिसांनी चौकशी केली. तिच्या मुलावर पोलिसांना संशय आला. त्यानेही शेवटी मीच चोरी केल्याचं कबुल केलं. आता तो पोलिसांच्या ताब्यात आहे.

हे सुद्धा वाचा