VIDEO | तुकाराम मुंढेंच्या काळात आरोग्य साहित्य खरेदीत अनियमितता, त्रिसदस्यीय समितीकडून चौकशी

तत्कालीन नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंडे (Tukaram Mundhe) यांच्या काळातील साहित्य खरेदीची चौकशी होणार आहे.

नागपूर : तत्कालीन नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंडे (Tukaram Mundhe) यांच्या काळातील साहित्य खरेदीची चौकशी होणार आहे. मुंडेंच्या काळात आरोग्य साहित्य, औषधांच्या खरेदीत अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे चौकशीसाठी तीन सदस्यीय चौकशी समितीची महापौरांनी घोषणा केली आहे. (Irregularities in procurement of health materials during Tukaram Mundhe’s tenure, inquiry by a three-member committee)

चौकशीसाठी मनपा आयुक्त राधाकृष्ण बी. यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. पण महानगरपालिका प्रशासनाने हे आरोप फेटाळले आहेत. प्रत्येक खरेदी नियमानुसार झाल्याचं मनपा प्रशासनानं स्पष्टीकरण दिलं आहे. तरिही भाजपवर कोणी बोट दाखवू नये, म्हणून चौकशीचे आदेश दिल्याचे मनपाचे सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी सांगितले.

इतर बातम्या

नागपूरमध्ये आरोग्यव्यवस्थेचे तीनतेरा; ज्या तुकाराम मुंढेंचा भर सभागृहात अपमान केला त्यांनाच पुन्हा बोलवण्याची मागणी

कोरोना काळात तुकाराम मुंढेंनी चांगलं काम केलं: नितीन गडकरी

(Irregularities in procurement of health materials during Tukaram Mundhe’s tenure, inquiry by a three-member committee)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI