विदर्भातील कोरोनाचे रुग्ण कमी, 11 जिल्ह्यात सापडले 10 रुग्ण, बरे होण्याचं प्रमाण जास्त

| Updated on: Nov 19, 2021 | 3:52 PM

कोरोना विषाणमुळं विदर्भात आतापर्यंत 21,377 मृत्यू झाले आहेत. विदर्भाचा रिकव्हरी रेट 98 टक्के आहे. तर, 1.9 टक्के रुग्ण दगावले आहेत. नागपूर जिल्ह्यात सध्या 61 रुग्ण उपचार घेत आहेत.

विदर्भातील कोरोनाचे रुग्ण कमी, 11 जिल्ह्यात सापडले 10 रुग्ण, बरे होण्याचं प्रमाण जास्त
कोरोना लसीकरण
Follow us on

नागपूर : गेल्या 24 तासांत विदर्भात 10 रुग्ण आढळले. 10 नोव्हेंबरपासून आतापर्यंतही ही विदर्भातील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. 10 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. ही 13 नोव्हेंबरपासूनच कोरोनामुक्त झालेल्यांची सर्वात जास्त संख्या आहे.

कोरोना विषाणमुळं विदर्भात आतापर्यंत 21,377 मृत्यू झाले आहेत. विदर्भाचा रिकव्हरी रेट 98 टक्के आहे. तर, 1.9 टक्के रुग्ण दगावले आहेत. नागपूर जिल्ह्यात सध्या 61 रुग्ण उपचार घेत आहेत.

शहरात 28 लाख लसीकरण

नागपूर शहरात आतापर्यंत 27 लाख 90 हजार 881 लसी देण्यात आल्या. त्यापैकी पहिला डोज 17 लाख 59 हजार 181 नागरिकांना देण्यात आला. तर, दूसरा डोज 10 लाख 31 हजार 700 नागरिकांना देण्यात आलाय.

शासकीय केंद्रांवर निःशुल्क लस

राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसीच्या पर्याप्त पुरवठा प्राप्त झालाय. त्यामुळं १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केंद्रांवर करण्यात येत आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. मनपातर्फे नागरिकांना मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांना प्रथम डोज, दुसरा डोज घेण्यासाठी लस पुरेश्या प्रमाणात उपलब्ध असल्याचं कळविण्यात आलं आहे. लसीकरणसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल, ही माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.
तसेच ड्राइव्ह इन व्हॅक्सीनेशन केंद्रावरसुद्धा १८ वर्षावरील व ४५ वर्षावरील सर्व नागरिकांचे कोव्हिशिल्डचे लसीकरण होत आहे, ही माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी दिली.

या केंद्रांवर उपलब्ध आहे लस

तसेच १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन पहिला व दुसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज), डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, कामठी रोड व स्व. प्रभाकर दटके मनपा, महाल रोग निदान केंद्र, एम्स, आयसोलेशन रुग्णालय, इमामवाडा, इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, मनपा स्त्री रुग्णालय पाचपावली, प्रगती हाल दिघोरी येथे उपलब्ध असल्याचे मनपाच्या वतीनं कळविण्यात आलं आहे.

बळीराजाच्या रेट्यापुढे हुकूमशाही वृत्तीचे मोदी सरकार झुकले; नाना पटोलेंचा हल्लाबोल

एकाच जागी वीज प्रकल्प नकोत, पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होतात, शरद पवार यांचे मत

कोराडी, खापरखेडा प्रकल्पाचा धोका, हवा-पाणी-माती प्रदूषित, पर्यावरणावर परिणाम