कोराडी, खापरखेडा प्रकल्पाचा धोका, हवा-पाणी-माती प्रदूषित, पर्यावरणावर परिणाम

भूपृष्ठावरील पाणी आणि भूजल हे मर्क्युरी, आर्सेनिक, अॅल्युमिनिअम, लिथिअम इत्यादीसारख्या विषारी धातूंनी दूषित झाले. फ्लाय अॅशमुळे व्यापक स्तरावर हवा, पाणी आणि माती दूषित झाल्याचे अभ्यासातून दिसून आले.

कोराडी, खापरखेडा प्रकल्पाचा धोका, हवा-पाणी-माती प्रदूषित, पर्यावरणावर परिणाम
Follow us
| Updated on: Nov 19, 2021 | 1:50 PM

नागपूर : कोराडी आणि खापरखेडा थर्मल पॉवरमुळं पर्यावरणाचं नुकसान होत आहे. या प्रकल्पांमुळं हवा, पाणी आणि माती प्रदूषित होत असल्याचा धक्कादायक अहवाल बाहेर आला आहे. सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, मंथन अध्ययन केंद्र आणि असर संस्थेनं याबद्दल सर्वे केला होता.

महाराष्ट्र विद्युत निर्मिती कंपनीच्या (महानिर्मिती) कोराडी (२४०० मेगावॅट) आणि खापरखेडा (१३४० मेगावॅट) प्रकल्पांच्या भोवतालच्या प्रदेशात प्रदूषण होत आहे. भूपृष्ठावरील पाणी आणि भूजल हे मर्क्युरी, आर्सेनिक, अॅल्युमिनिअम, लिथिअम इत्यादीसारख्या विषारी धातूंनी दूषित झाले. फ्लाय अॅशमुळे व्यापक स्तरावर हवा, पाणी आणि माती दूषित झाल्याचे अभ्यासातून दिसून आले.

पोल्युटेड पॉवर : हाऊ कोराडी अॅण्ड खापरखेडा थर्मल पॉवर स्टेशन्स आर इम्पॅक्टिंग द एन्व्हायरन्मेन्ट, या शीर्षकाखाली हा अभ्यास करण्यात आला. दोन्ही विद्युत निर्मिती केंद्रे आणि अॅश पॉण्डमधून होणारा प्रदूषक घटकांचा विसर्ग तातडी थांबविणं गरजेचं आहे. स्थानिक प्रतिनिधी, नागरी संस्था सदस्य आणि स्वतंत्र तज्ज्ञांच्या समितीच्या निरीक्षणाखाली प्रदूषणामुळे झालेले दुष्परिणाम दूर करावे, असं हा अभ्यास सुचवतो.

यंत्रणा समस्या सोडविण्यात अपयशी

दोन्ही विद्युत निर्मिती प्रकल्प आणि अॅश पॉण्डसारख्या प्रकल्पाशी संबंधित पायाभूत रचनांमुळे या भागात दीर्घ काळापासून प्रदूषणाच्या नोंदी आहेत. अधिकृत यंत्रणा या समस्या सोडवण्यामध्ये सपशेल अपयशी ठरल्या असल्यानं हा अभ्यास करण्यात आलाय, असं सीएफएसडीच्या संचालक लीना बुद्धे म्हणाल्या.

केंद्रीय पर्यावरण, वने आणि वातावरण बदल मंत्रालयाने कोराडी प्रकल्पास दोन नवीन युनिटसह (प्रत्येकी ६६० मेगावॅट) विस्तारीकरणासाठी पर्यावरणीय आकलन करण्यासाठी असलेले मुद्दे दिले आहेत, अशी माहिती लीना बुद्धे यांनी दिली. यामुळे प्रदूषण आणखी वाढणार असून ही चिंतेची बाब आहे, असे बुद्धे यांनी सांगितलं.

पाण्याचे स्रोत प्रदूषित

मंथन अध्ययन केंद्राचे समन्वयक श्रीपाद धर्माधिकारी यांनी सांगितले की, कोराडी आणि खापरखेडा विद्युत प्रकल्पांमुळे या भागातील पाण्याचे स्रोत प्रदूषित झाले आहेत. या प्रकल्पांमुळे होणाऱ्या हवा प्रदूषणाबाबत काही प्रमाणात लक्ष वेधले गेले आहे. पण पाणी प्रदूषणाबाबत तपशीलवार विश्लेषण आजवर उपलब्ध नव्हते. या अभ्यासातून विद्युत प्रकल्पांमुळे होणाऱ्या दूषित पाण्याचा सर्वसमावेशक नकाशा तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच अभ्यास असू शकतो, असे धर्माधिकारी म्हणाले.

विषारी खर्रा, कर्करोगास निमंत्रण, कारवाई करणार कोण?

तीर्थ शहाचे अवयवदान, दोघांना मिळाली दृष्टी, तिघांना जीवनदान

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.