एकाच जागी वीज प्रकल्प नकोत, पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होतात, शरद पवार यांचे मत

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सध्याच्या पर्यटन सुविधा समाधानकारक आहेत. प्रदूषणमुक्त उद्योग म्हणून त्याकडे बघावे लागेल, असेही पवार म्हणाले. सुरजागड लोहखनिज प्रकल्प हा विदर्भाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. त्यामधून 10 हजार रोजगार निर्मिती केली जाते.

एकाच जागी वीज प्रकल्प नकोत, पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होतात, शरद पवार यांचे मत
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Nov 19, 2021 | 2:53 PM

नागपूर : राज्याची एक तृतीयांश वीज चंद्रपुरात तयार केली जाते. मात्र, आता एकाच जागी वीज प्रकल्प नकोत. त्यातून पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होतात, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय. उद्योजकांशी संवाद साधताना ते चंद्रपुरात आज बोलत होते.

विदर्भात कापूस पिकविला जातो. त्यामुळं कापसावर आधारित टेक्सटाईल उद्योग महत्त्वाचे आहेत. तसे उद्योग उभारणे चंद्रपूरसाठी महत्त्वाचे असल्याचं शरद पवार म्हणाले. कोणत्याही व्यवसायासाठी गुंतवणूकदारांना योग्य वातावरण हवे, मजुरांची उत्पादकता हवी. कापूस हा कच्चा माल आहे. तो उपलब्ध असल्यानं विदर्भात त्यावर आधारित उद्योगधंदे हवेत, असं पवार म्हणाले.

उद्योगात स्थानिकांना रोजगार मिळावा

शरद पवार म्हणाले, इथेनॉल उद्योग चंद्रपुरात येणार आहेत. हायड्रोजन निर्मिती आता भविष्यात होणार आहे. त्यामुळं हा प्रयोग प्रदूषणमुक्तीसाठी पर्याय ठरणार आहे. चंद्रपुरात येणाऱ्या उद्योगात स्थानिकांना रोजगार देण्याचा राज्य सरकार प्रयत्न करेल, असेही शरद पवार म्हणाले.

सुरजागड प्रकल्प सुरळीत चालावा

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सध्याच्या पर्यटन सुविधा समाधानकारक आहेत. प्रदूषणमुक्त उद्योग म्हणून त्याकडे बघावे लागेल, असेही पवार म्हणाले. सुरजागड लोहखनिज प्रकल्प हा विदर्भाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. त्यामधून 10 हजार रोजगार निर्मिती केली जाते. तो सुरळीत चालावा यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन शरद पवार यांनी दिले.

गोंडवाणा विद्यापीठाच्या रिक्त जागा भराव्यात

चंद्रपूर हा राज्याचे नेतृत्व करणारा जिल्हा आहे. असे सांगून कर्मवीर मा. सां. कन्नमवार यांचे स्मरण शरद पवार यांनी केले. या जिल्ह्याला पुढे जाण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचं आश्वासनंही पवारांनी दिलंय. तसेच गोंडवाना विद्यापीठ हे पूर्व विदर्भाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळं या विद्यापीठातील रिक्त जागा भरल्यास विद्यार्थ्यांना चागंल्या दर्जाचे शिक्षण मिळेल. यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन शरद पवार म्हणालेत.

उद्योग आणि रोजगार यात समन्वय हवा

उद्योग आणि रोजगार यात समन्यव हवा. पूरक उद्योग एकाच ठिकाणी हवे याचा हट्ट नको, असेही शरद पवार म्हणाले. वेगवेगळ्या ठिकाणी उद्योग आल्यास विविध भागात छोटे उद्योग सुरू होतील, असे मत पवार यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र, बंगाल अन् केरळ सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न; शरद पवारांचा गंभीर आरोप

बड्या शहरात शहरी नक्षलवाद वेगाने पसरतोय, त्वरीत कारवाई करा; शरद पवारांच्या सरकारला सूचना

निवडणुकीत किमत चुकवावी लागेल म्हणून कायदे मागे, उशिरा का होईना शहाणपण आलं; पवारांचा मोदी सरकारला टोला

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.