AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाविकास आघाडीला बंडखोरीची ‘वाळवी’, नागपुरात तब्बल 3 उमेदवार, नेमका खरा कोण?

नागपूरच्या पदवीधर आणि औरंगाबादच्या शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) बंडखोरी झालीय. नागपुरात महाविकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणात आहेत.

महाविकास आघाडीला बंडखोरीची 'वाळवी', नागपुरात तब्बल 3 उमेदवार, नेमका खरा कोण?
| Updated on: Jan 17, 2023 | 4:03 PM
Share

गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर : नागपूरच्या पदवीधर आणि औरंगाबादच्या शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) बंडखोरी झालीय. नागपुरात महाविकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणात आहेत. तर भाजपकडून एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणार आहे. नागपुरात काँग्रेसचे सुधाकर आडबाले (Sudhakar Adbale) मविआकडून निवडणूक लढवत आहेत. शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडेही (Rajendra Zade) मैदानात आहेत. विशेष म्हणजे कपिल पाटलांची शिक्षक भारती महाविकास आघाडीचाच भाग आहे. तर राष्ट्रवादीच्या सतीश इटकेलवार यांनीही अर्ज मागे घेतला नाही, त्यामुळे तेही मैदानात आहेत. तर अपक्ष नागो गाणार यांना भाजपनं पाठींबा जाहीर केलाय. त्यामुळे नागपूरच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत कोण जिंकतं ते पाहणं महत्त्वाचं आहे. या निवडणुकीत मविआचे तीन उमेदवार असल्याने तीनही घटक पक्षांकडे आपल्या आघाडीचा अधिकृत उमेदवार निवडून आणण्याचं मोठं आव्हान आता उभं राहिलं आहे.

दुसरीकडे आता हाही प्रश्न आहे की, महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार कोण? तर काँग्रेसचे सुधाकर आडबालेच मविआचे उमेदवार असू शकतात. कारण खासदार संजय राऊतांनी ठाकरे गटाचा सुधाकर आडबालेंनाच पाठिंबा असेल हे जाहीर केलंय.

महाविकास आघाडीत नागपूर-नाशिकच्या जागेत अदलाबदल

विशेष म्हणजे नागपूरची जागा ठाकरे गटाला मिळाली होती. तर नाशिक पदवीधरची जागा काँग्रेसला सुटली होती. मात्र नाशिकमध्ये काँग्रेसच्या उमेदवारीवरुन घोळ झाला. आणि नागपूर-नाशिकच्या जागेत अदलाबदल झाली. त्याप्रमाणं नागपुरातून ठाकरे गटाचे गंगाधर नाकाडेंनी आपली उमेदवारी मागे घेतली. तेही अवघे 5 मिनिटं शिल्लक असताना, नाकाडेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय.

ज्याप्रमाणं ठाकरे गटाच्या नाकडेंना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींनी दिले. त्याचप्रमाणं राष्ट्रवादीकडून सतीश इटकेलवार यांनाही अर्ज मागे घेण्यास सांगण्यात आलं होतं. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी त्यांना फोनही केला. पण त्यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीनं इटकेलवारांना निलंबित केलंय.

औरंगाबादमध्ये महाविकास आघाडीचे दोन उमेदवार

इकडे औरंगाबादच्या शिक्षक पदवीधर निवडणुकीतही राष्ट्रवादीचेचे 2 उमेदवार झालेत. राष्ट्रवादीच्या प्रदीप सोळुंकेंनी अर्ज मागे घ्यावा यासाठी अनेक प्रयत्न झाले. पण अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत नॉटरिचेबल राहून सोळुंकेंनी बंडखोरी केली.

औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीच्या प्रदीप सोळुंकेंनी (Pradip Solunke) बंडखोरी केलीय. औरंगाबादमध्ये तिहेरी लढत होणार आहे.

औरंगाबादच्या शिक्षक पदवीधरमध्ये, विक्रम काळे हे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार आहेत. राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार प्रदीप सोळुंके मैदानात आहेत. तर भाजकडून किरण पाटील मैदानात आहेत. म्हणजेच औरंगाबादमध्ये तिहेरी लढत होणार आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.