महाज्योतीकडून विद्यार्थ्यांना टॅबचं वितरण, जेईई नीट परीक्षेच्या तयारीमध्ये फायदा होणार

| Updated on: Oct 04, 2021 | 3:40 PM

महाज्योती संस्थेकडून ओबीसी, आणि व्हीजेएनटीच्या विद्यार्थ्यांना आज निःशुल्क टॅबचं वितरण करण्यात आलंय. जेईई, नीट परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना टॅबचं वितरण करण्यात आलंय.

महाज्योतीकडून विद्यार्थ्यांना टॅबचं वितरण, जेईई नीट परीक्षेच्या तयारीमध्ये फायदा होणार
महाज्योतीकडून टॅबचं वितरण
Follow us on

नागपूर: महाज्योती संस्थेकडून ओबीसी, आणि व्हीजेएनटीच्या विद्यार्थ्यांना आज निःशुल्क टॅबचं वितरण करण्यात आलंय. जेईई, नीट परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना टॅबचं वितरण करण्यात आलंय. आजपासून टॅब वितरण सुरु झालं असून, सहा हजार विद्यार्थ्यांना टॅब दिला जाणार, अशी माहिती महाज्योतीचे अध्यक्ष आणि ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलीय.

टॅबमध्ये नेमकं काय?

महाज्योतीकडून देण्यात आलेल्या टॅबमध्ये 3 जिबी रॅम आणि रोज 64 जीबीजी डेटा ची सोय आहे. महाज्योतीकडून जपासून टॅब वितरण सुरु झालं असून, सहा हजार विद्यार्थ्यांना टॅब दिला जाणार, अशी माहिती महाज्योतीचे अध्यक्ष आणि ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलीय. तर ज्या विद्यार्थ्यांना टॅब मिळाले, त्यांनी महाज्योतीचे आभार मानलेत.

विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?

आजच्या दिवशी 3 हजार टॅबचं वितरण केलं जात आहे. जेईई परीक्षा, नीट परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांसाठी टॅबचा वापर विद्यार्थ्यांना करता येईल. महाज्योती संस्था ओबीसी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी कार्यरत राहील. पुढील काळात यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील टॅब दिला जाणार आहे. या टॅबमध्ये सीमकार्ड देखी आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

आदिश्री माने या विद्यार्थिनीनं महाज्योती या संस्थेकडून टॅब मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. टॅब मिळाल्यामुळं अभ्यास करणं सोपं जाईल, असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. मोबाईलपेक्षा टॅबची स्क्रीन मोठी असल्य

पूर्वा पारखी या विद्यार्थिनीनं टॅबमुळं अभ्यास करण्यास मदत होईल, असं म्हटलंय. मोबाईलवर अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी महाज्योतीकडून मिळालेल्या टॅबमुळं दूर होणार आहेत, असं पूर्वा पारखी हिनं सांगितलं आहे.

महाज्योती जेईई, नीटचं मोफत प्रशिक्षण देणार

महाराष्ट्र शासनाच्या ‘महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थे’तर्फे (महाज्योती) राज्यातल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयापासून ते पीएचडीपर्यंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं. आता महाज्योतीच्या वतीने ओबीसी , भटक्या जाती-जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जेईई , नीट आणि सीईटी परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन केलं जाणार आहे.

दहावी पास झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना इंजिनिअर (Engineering) आणि मेडिकलसाठी (Medical) तयारी करायची असते. मात्र, आर्थिक परिस्थिती नसल्याने महागडे कोचिंग क्लासेस लावणं शक्य नसतं. अशा विद्यार्थ्यांसाठी महाज्योती संस्थेने हा ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. यामध्ये दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन दिलं जाणार आहे.

2023 मध्ये होणाऱ्या जेईई, नीट आणि सीईटी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे. त्यासाठी यावर्षी विद्यार्थ्यांने दहावी उत्तीर्ण केलेली हवी आणि अकरावीसाठी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. शहरी विभागात शिकणार्‍या विद्यार्थ्यांना यंदाच्या दहावीच्या परीक्षेत 70 % तर ग्रामीण, आदिवासी किंवा नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना 60% गुण असणे आवश्यक आहेत.

इतर बातम्या:

‘महाज्योती’च्या विभागीय कार्यालयाचे औरंगाबादेत उद्घाटन; ओबीसी, भटक्या विमुक्त जमाती, शेतमजूर व शेतकऱ्यांसाठी कोणत्या योजना?

महाज्योतीच्या UPSC चाचणी परीक्षेला मुदतवाढ, विजय वडेट्टीवारांच्या घोषणेने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

Mahajyoti distributed Tab for OBC students for preparation of Jee and Neet exam Vijay Wadettiwar also present there