AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MVA Nagpur Rally : आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्रभूषण ही आनंदाची गोष्ट, पण… उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मान करण्यात आला होता. याचाच धागा पकडत ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या वज्रमूठ सभेला संबोधित करताना शिंदे-फडणवीस सरकारवर आसूड ओढलंय.

MVA Nagpur Rally : आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्रभूषण ही आनंदाची गोष्ट, पण... उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
| Updated on: Apr 16, 2023 | 9:14 PM
Share

मुंबई : ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मुंबईतील खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मान करण्यात आला होता. याचाच धागा पकडत ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या वज्रमूठ सभेला संबोधित करताना शिंदे-फडणवीस सरकारवर आसूड ओढलंय.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, ही आनंदाची गोष्ट आहे. पण हा पुरस्कार कुणाच्या हस्ती देण्यात आला? सच्च्या समाजसेवकासमोर झुकावं लागतं. आप्पासाहेब यांचं घराणं मोठं आहे. या घराण्याची मोठी परंपरा आहे. त्यांचं घराणं व्यसनमुक्तीचं काम करतात. दारुचं व्यसन घर उद्ध्वस्त करतं पण सत्तेची नशा देश उद्ध्वस्त करते. एवढी लोकं जमली आहेत. पण आपल्या देशात आज लोकशाहीचा उपयोग फक्त सत्तेत बसलेल्यांच्या मित्रांचा गिऱ्हाईक आणि सत्ताधाऱ्यांच्या मतदार वाढवण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

जगाच्या श्रीमंतीत अव्वल, यांच्या मित्रांचे क्रमांक वाढत चालला आहे, पण गोरगरीब जनतेचा क्रमांक खाली चालला आहे. ही तीच भूमी आहे ज्या भूमीत बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवलं. बाबासाहेबांनी देशाला संविधान दिलं आहे. हा डेकोरेशनचा भाग नाही. भारत मातेच्या पायात पुन्हा बेड्या घालण्याचं काम सुरु आहे. एका माणसाने देशाला घटना दिली. मग एवढी मोठी जनता संविधान वाचवू शकत नाही. मी घटना बचाव करणार असं म्हणार नाही तर घटनेचं संरक्षण मीच करणार असं म्हणेन, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.