AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Metro : माझी मेट्रो नागपूरची जीवन वाहिनी बनतेय, मेट्रो स्टेशन ठरताहेत लँडमार्क, रोज 60 हजार नागरिकांचा प्रवास

पर्यावरणाचे संवर्धन होणार आहे. ग्रीन सीटी संकल्पनेत वाहने कमी वापरली जाणे अपेक्षित आहे. याशिवाय मेट्रोमध्ये सौर ऊर्जेचा 60 टक्के वापर केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

Nagpur Metro : माझी मेट्रो नागपूरची जीवन वाहिनी बनतेय, मेट्रो स्टेशन ठरताहेत लँडमार्क, रोज 60 हजार नागरिकांचा प्रवास
अनिल कोकाटे यांचा सत्कार करताना जिल्हाधिकारी आर विमला.
| Updated on: Jul 22, 2022 | 4:00 AM
Share

नागपूर : महामेट्रो दिवसेंदिवस नागपूरची जीवनवाहिनी होत चालली आहे. दररोज सुमारे 60 हजार नागरिक या माझी मेट्रोने प्रवास करीत असतात. ही संख्या हळूहळू 2 लाख प्रवाशांवर जाणार आहे. मेट्रो ही शहराची आवश्यकता आहे. प्रवाशांच्या वाढत्या संख्येने माझी मेट्रो शहराची जीवन वाहिनी होत आहे, असे महामेट्रोचे संचालक (स्ट्रॅटेजीक प्लॅनिंग) अनिल कोकाटे (Anil Kokate) यांनी केले. नागपूर जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने व महाआयटीच्या तांत्रिक सहकार्याने आयोजित वेबचर्चा संवादात ते बोलत होते. बदलते नागपूर आणि वाहतूक व्यवस्थेत (Transport System) माझी मेट्रोची भूमिका या विषयावर कोकाटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. प्रारंभी जिल्हाधिकारी आर. विमला (Collector R. Vimala) यांनी त्यांचे स्वागत केले. महामेट्रोची नागपुरातील परिवहन व्यवस्थेत मोलाची भूमिका आहे. दररोज 60 हजार प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे त्यांच्या स्वत:च्या वाहनावरील खर्चात बचत होते. त्यासोबतच वातावरण प्रदूषणमुक्त राहते. नागपुरातील शुध्द वातावरणासाठी मेट्रोची निवड योगच असे अनिल कोकाटे म्हणाले.

38 मेट्रो स्टेशन कार्यान्वित होणार

पूर्ण क्षमतेने मेट्रो कार्यरत झाल्यावर दोन लाख प्रवासी प्रवास करतील, असेही अनिक कोकाटे यांनी सांगितले. त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन होणार आहे. ग्रीन सीटी संकल्पनेत वाहने कमी वापरली जाणे अपेक्षित आहे. याशिवाय मेट्रोमध्ये सौर ऊर्जेचा 60 टक्के वापर केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. महामेट्रो नागपूरसह पुणे, नाशिक, ठाणे आराखडा तयार झाला तर औरंगाबाद येथील आराखडा तयार करण्यात येत आहे. राज्य शासनाची त्यास मंजुरी मिळाली असून, केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. लवकरच तेथेही प्रकल्प कार्यान्वित होईल, असे ते म्हणाले. माझी मेट्रोमुळे नागपूर शहराचा सर्वांगीण विकास होणार आहे. 38 किलोमीटर लांबी व 38 मेट्रो स्टेशन कार्यान्वित होणार आहेत. त्यामुळे अंदाजे 3 लाख नागरिक या मेट्रोचा लाभ घेतील, असे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

माझी मेट्रो सामान्यांना परवडणारी

मेट्रोची सेवा सर्वांना मिळावी यावर आमचा भर असल्याचे सांगून अनिल कोकाटे म्हणाले की, मेट्रोमुळे अपघातात घट होत असून सुरक्षितेत वाढ झाली आहे. त्यासोबतच महागाईच्या काळात माझी मेट्रो सामान्य नागरिकांना परडणारी आहे. दर दिड मिनीटाला एक याप्रमाणे मेट्रो सोडण्याचाही आमचा प्रयत्न आहे. महामेट्रोचे जाळे संपूर्ण नागपुरात परविणार आहोत. दोन अर्बन फारेस्ट मेट्रोने शहरात उभारले आहेत. मेट्रो स्टेशन भविष्यात नागपुरातील लँडमार्क ठरणार आहेत. नागरिकांसाठी महाकार्डच्या व्यवस्थेमुळे डिजीटल पेमेंटचा वापर वाढला आहे. त्यासोबत ऑटो, महापालिका बस यांच्याशी फिडर सर्व्हिसमुळे नागरिकांना सुविधा प्राप्त होणार आहे. कनेक्टीव्हिटी वाढणार आहे. त्यासोबतच कमर्शियल डेव्हलपमेंटसुध्दा चालू आहे. तिकिटाव्यतिरिक्त पैसा यावा, हा यामागील उद्देश आहे. महामेट्रोत सौर उर्जेची संकल्पना राबविण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. माझी मेट्रो नागरिकांना माझी वाटली पाहिजे त्यादृष्टिकोनातून मेट्रोची वाटचाल सुरू असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले. जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी या संचालन केले.

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.