शाळा सुरु, कॅालेज सुरु, मग क्लासेस बंद का? क्लासेस संचालकांचा सरकारला सवाल, विद्यार्थ्यांसह आंदोलनाचा इशारा

| Updated on: Oct 23, 2021 | 10:50 AM

महाराष्ट्रातील शाळा आणि महाविद्यालय सुरु होत असताना कोचिंग क्लासेसला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. कोचिंग क्लासेस सुरु करण्यासाठी क्लासेसचे संचालक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

शाळा सुरु, कॅालेज सुरु, मग क्लासेस बंद का? क्लासेस संचालकांचा सरकारला सवाल, विद्यार्थ्यांसह आंदोलनाचा इशारा
कोचिंग क्लास सुरु करण्याची मागणी
Follow us on

नागपूर: महाराष्ट्र सरकार आता राज्यात सरसकट शाळा सुरु करण्याचा विचार करत आहे. पहिली ते चौथीचे वर्ग देखील सुरु करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न असल्याचं कळतंय. महाराष्ट्रातील शाळा आणि महाविद्यालय सुरु होत असताना कोचिंग क्लासेसला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. कोचिंग क्लासेस सुरु करण्यासाठी क्लासेसचे संचालक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. नागपूरमधील क्लासेस चालवणाऱ्या संचालकांनी विद्यार्थ्यांसह आंदोलन करण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. कोचिंग क्लासेस सुरु करण्यासंदर्भात राज्य सरकार काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे.

कोचिंग क्लासेसचं बंद का?

शाळा सुरु, महाविद्यालये सुरु,थिएटरंही सुरु झाली आहेत, मग कोचिंग क्लासेस बंद का? हा सवाल नागपुरातील क्लासेसच्या संचालकांनी उपस्थित केलाय. क्लासेस सुरु नसल्याने विद्यार्थी स्पर्धेमध्ये मागे पडतात, शिवाय कोचिंग क्लासेस आर्थिक संकटात आलेय. असं म्हणत क्लासेस सुरु करण्याची मागणी क्लासेस संचालकांनी केलीय. कोचिंग क्लासेस सुरु केले नाही, तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय ‘सरकार जगाव वाणिज्य बचाव’चे अध्यक्ष दिपेन अग्रवाल यांनी दिला आहे.

अर्थकारण बिघडलं

मार्च 2020 मध्ये कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यापासून लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं. महाराष्ट्र सरकारनं अनलॉक अंतर्गत अनेक गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली होती. महाराष्ट्र सरकारनं शाळा- महाविद्यालय सुरु करण्यास परवानगी दिल्यानंतर आता कोचिंग क्लासेस संचालक क्लास सुरु करण्यासाठी आक्रमक झाले आहेत. 18 महिन्यांपासून अधिक काळ क्लासेस बंद असल्यानं क्लासेसच्या संचालकांचं आर्थिक नुकसान होत आहे.

विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान

कोरोना विषाणू संसर्गामुळं क्लासेस बंद करण्यात आले होते. तेव्हापासून क्लासेस बंद असल्यानं विद्यार्थ्यांचंही शैक्षणिक नुकसान होतं आहे. जेईई परीक्षा, नीट परीक्षा, संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचं मार्गदर्शन करणारे क्लासेस बंद असल्यानं विद्यार्थ्यांचं देखील शैक्षणिक नुकसान होत आहे.

इतर बातम्या:

Petrol Diesel price: मोदी सरकार नागरिकांना दिवाळी गिफ्ट देणार, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट होणार?

कच्च्या तेलाचे दर तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर, भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ अटळ?

दसरा-दिवाळीपर्यंत ‘ही’ गोष्टही महागण्याची शक्यता; पेट्रोल, डिझेलनंतर ‘कॉमन मॅन’ला आणखी एक झटका

Nagpur Coaching classes demanded to Government gave permission to start coaching classes