सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवले, लग्नाच्या हॉलमध्ये घुसून कारवाई, 10 हजारांच्या दंडाची वसूली

| Updated on: Feb 17, 2021 | 9:03 AM

या लग्नाला 250 हून अधिक लोक आले होते. त्यामुळे महापालिकेच्या पथकाने या लग्नात जाऊन कारवाई करण्यात आली. | Nagpur

सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवले, लग्नाच्या हॉलमध्ये घुसून कारवाई, 10 हजारांच्या दंडाची वसूली
सध्याच्या नियमानुसार लग्नाला 100 माणसं बोलावण्याची मुभा आहे. मात्र, या लग्नाला 250 हून अधिक लोक आले होते. त्यामुळे महापालिकेच्या पथकाकडून या लग्नात जाऊन कारवाई करण्यात आली.
Follow us on

नागपूर: गेल्या काही दिवसांमध्ये नागरिकांकडून कोरोनाचा (Coronavirus) प्रसार रोखण्यासाठी घालून देण्यात आलेले सोशल डिस्टन्सिंगचे नियम सर्रासपणे धाब्यावर बसवले जात आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढायला लागली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आता कडक पावले उचलण्यात येत आहेत. (Nagpur Mahanagar Palika charge fine in wedding ceremony due to not following social distancing rules)

या सगळ्या परिस्थितीत लग्नसमारंभ धुमधडाक्यात साजरे करणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. मात्र, नागपुरात अशाच एका लग्नात प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. सध्याच्या नियमानुसार लग्नाला 100 माणसं बोलावण्याची मुभा आहे. मात्र, या लग्नाला 250 हून अधिक लोक आले होते. त्यामुळे महापालिकेच्या पथकाने या लग्नात जाऊन कारवाई केली.

दहा हजारांचा दंड

या लग्नात निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त लोक असल्याने आयोजकांना पाच हजार आणि सभागृहाच्या मालकांकडून पाच हजारांचा दंड आकारण्यात आला. नागपूर प्रशासनाकडून शहरातील सात मंगल कार्यालयांवर अशाप्रकारची कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांत नागपूरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.

…तर लॉकडाऊन करावाच लागेल; राजेश टोपेंच्या स्थानिक अधिकाऱ्यांना सूचना

राज्यातील कोरोना रुग्णांची (Coronavirus) संख्या पुन्हा वाढायला लागल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) होणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना महत्त्वाचा खुलासा केला. लॉकडाऊन हा आमच्यासाठी अंतिम पर्याय असेल, असे टोपे यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात कुठे कुठे लॉकडाउनची शक्यता ?

संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लागेल, याची शक्यता खूपच कमी आहे. परंतु सीमित लॉकडाऊन केला जाऊ शकतो. ठराविक भागांमध्ये लॉकडाऊन करायचं झाल्यास ज्या जिल्ह्यांमध्ये किंवा शहरांमध्ये कोरोनाच्या अधिक केसेस आहेत तिथे लॉकडाऊन होऊ शकतं. जसं की पुणे, नाशिक, अमरावती, वर्धा, मुंबई…. असंही होऊ शकतं की संपूर्ण जिल्ह्यात किंवा शहरात लॉकडाऊन लावण्याऐवजी फक्त जिथे कोरोनाच्या केसेस वाढत आहेत, तिथेच लॉकडाऊन केलं जाऊ शकतं.

मुंबईत कुठे कुठे लॉकडाऊनची शक्यता?

मध्य मुंबईच्या कुर्ल्यातलं नेहरु नगर, तिलक नगर, विक्रोळी, घाटकोपरला डेंजर झोन म्हणून गणलं जाऊ लागलंय. या विभागांना प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येऊ शकतं. मुंबई पश्चिममध्ये ब्रांदा, खार, अंधेरी, जोगेश्वरी (पूर्व) या भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या क्षेत्रांना देखील प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येऊ शकतं.

हे ही वाचा :

कोरोना संसर्ग वाढला, पुण्यात खासगी रुग्णालयात 50 टक्के बेड्स आरक्षित, अकोला जिल्ह्यात संचारबंदी

(Nagpur Mahanagar Palika charge fine in wedding ceremony due to not following social distancing rules)