सोशल मीडियाचा वापर जपून करा, सायबरतज्ज्ञ अजित पारसेंचा सल्ला

| Updated on: Nov 12, 2021 | 5:11 PM

देशभरात सोशल मिडिया वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढतेय. तरुणांसोबतच ज्येष्ठ नागरिकंही मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांचा वापर करतात. पण बऱ्याच केसेसमध्ये ज्येष्ठ नागरिक सायबर गुन्हेगारीच्या विळख्यात अडकतात. त्यामुळं ज्येष्ठ नागरिकांनी सोशल मिडिया जपून वापरावा, असा सल्ला सायबरतज्ज्ञ अजित पारसे यांनी दिला.

सोशल मीडियाचा वापर जपून करा, सायबरतज्ज्ञ अजित पारसेंचा सल्ला
Follow us on

नागपूर : देशभरात सोशल मिडिया वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढतेय. तरुणांसोबतच ज्येष्ठ नागरिकंही मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांचा वापर करतात. पण बऱ्याच केसेसमध्ये ज्येष्ठ नागरिक सायबर गुन्हेगारीच्या विळख्यात अडकतात. त्यामुळं ज्येष्ठ नागरिकांनी सोशल मिडिया जपून वापरावा, असा सल्ला सायबरतज्ज्ञ अजित पारसे यांनी दिला.

सोशल मिडिया वापराबाबत सायबर तज्ज्ञ अजित पारसे यांनी नागपुरात शिबिर घेतले. यावेळी ते बोलत होते. नागपूर शहरात एका वर्षात सायबर गुन्हेगारीमध्ये 104 टक्क्यांनी वाढ झालीय. दिवसेंदिवस सोशल माध्यमं वापरणाऱ्यांचं प्रमाण वाढत आहेत. त्यामुळे गुन्हेगारीतही वाढ झालीय. यात ज्येष्ठ नागरिक अडकू नये. सोशल मीडिया जपून वापरणे गरजेचे आहे. पेंशनधारक तसेच आर्थिकदृष्ट्या सबळ ज्येष्ठ नागरिकांना सायबर गुन्हेगार लक्ष्य करीत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी अनोळखी नागरिकांची फ्रेन्ड रिक्वेस्ट स्वीकारण्यापूर्वी विचार करावा, असे अजित पारसे म्हणाले.

सायबर सतर्कतेवर मार्गदर्शन

नागपुरातील सुयोगनगर येथील महात्मा फुले उद्यान सभागृहात साई सावली वृद्धाश्रमतर्फे सोशल मिडियाचा वापर तसेच सायबर सतर्कता यावर मार्गदर्शन शिबिर आयोजित केले. शिबिराचे उद्‍घाटन माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. व्यासपीठावर नगरसेविका विशाखा मोहोड, पोलिसांच्या गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र आंभोरे उपस्थित होते.

सोशल मीडिया दुधारी तलवार

पारसे म्हणाले, सोशल मीडिया दुधारी तलवार आहे. त्याचा योग्य वापर निश्चितच फायद्याचा आहे. परंतु अलीकडे सायबर गुन्हेगार सक्रीय झाले आहेत. ते टारगेट शोधत असतात. यात महिला तसेच ज्येष्ठ नागरिक बळी पडल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे कुणाशीही संवाद करताना, फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना सावध राहण्याची गरज आहे. घरातील फोटो, बाहेर गेल्याचे फोटो टाकणे टाळावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

राज ठाकरे थोड्याच वेळात घेणार शरद पवारांची भेट; एसटी कामगारांचा संप मिटणार?

सहकाऱ्याच्या हत्येप्रकरणी पनवेलची महिला कॉन्स्टेबल गजाआड, वरिष्ठाच्या हत्येचा शिजणारा कटही उघड