AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत नाचतानाचा ठाकरे गटातील बड्या नेत्याचा व्हिडीओ व्हायरल

Sudhakar badgujar viral video : १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी सलीमसोबत ठाकरे गटातील बड्या नेत्याचा नाचतनाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये संबंधित स्पष्टपणे दिसत असल्याने उबाठा गटाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Video : 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत नाचतानाचा ठाकरे गटातील बड्या नेत्याचा व्हिडीओ व्हायरल
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Dec 15, 2023 | 3:51 PM
Share

मुंबई : हिवाळी अधिवेशन सूरू असून सभागृहात आज १९९३ च्या बॉम्बस्फोटावरून सत्ताधाऱ्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. या बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम याच्यासोबत ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा नाचतानाचा व्हीडिओ समोर आला आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे गटावर टीका करताना सुधाकर बडगुजर यांचं नाव घेतलं आहे. भाजपच्या इतर नेत्यांनीही टीका करत चौकशी करण्याची मागणी केली होती.

सुधाकर  बडगुजर यांच्या व्हीडीओवरून भाजप आमदार नितेश राणे मंत्री दादा भुसे, आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना चौकशीची मागणी केली. आरोपी सलीम हा पेरोलवरती असताना पार्टी करत असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे. यावर बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत कोणी पार्टी करत असेल तर त्याची चौकशी होईल. ही चौकशी एसआयटीकडून करण्यात येईल. त्यासाठी एसआयटीला विशिष्ट काळाची मुदत दिली जाईल, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

सुधाकर बडगुजर हे नाशिकचे महानगर प्रमुख म्हणून काम पाहतात. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी  उद्धव ठाकरेंबाबत अपशब्द वापरले म्हणून राज्यात त्यांच्यावर सुधाकर बडगुजर यांनी पहिला गुन्हा दाखल केला होता. सुधाकर यांचा कार्यकर्ता पवन मटाले याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?