Nitin Gadkari: गडकरी पंजाबमधून लढवणार निवडणूक? कुणी दिली मोठी ऑफर? काय केला मोठा गौप्यस्फोट

नागूपरकरांसाठी मंत्री नितीन गडकरी यांनी विकासाचा रोडमॅप मांडला. खास मुलाखतीत त्यांनी नागपूर शहरांसाठी काय काय केले आणि काय करणार यांची दिशा स्पष्ट केली. तर त्याचवेळी त्यांनी राजकीय गौप्यस्फोट केला. पंजाबमधून निवडणूक लढवण्यासाठी त्यांना कुणी दिली ती मोठी ऑफर?

Nitin Gadkari: गडकरी पंजाबमधून लढवणार निवडणूक? कुणी दिली मोठी ऑफर? काय केला मोठा गौप्यस्फोट
नितीन गडकरी
Image Credit source: गुगल
| Updated on: Jan 13, 2026 | 12:48 PM

Nitin Gadkari: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर महापालिका निवडणुकीपूर्वी दिलेल्या खास मुलाखतीत नागपूरसाठी विकासाचा रोडमॅप मांडला. नागपूरकरांचे आपल्यावर मोठे ऋण असल्याचे गडकरी म्हणाले. या मुलाखतीत, नागपूर शहराच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्याचे त्यांनी सांगितले. तर नागपूरमधील तरुणांसाठी आणि खेळाडूंसाठी योजना राबविण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. ड्रेनेज लाईनपासून तर अतिक्रमणमुक्त रस्त्याविषयी त्यांनी विचार मांडले.

नागपूर विकासाचे नवीन मॉडेल

आम्ही कचऱ्यापासून सीएनजी गॅस तयार करतो आहे त्यापासून आम्ही स्कूटर मोटर बसेस चालणार आहे . नागपुरात रोज कमीत कमी एक लाख युवक हे मैदानावर खेळले पाहिजे आमच्या आग्रह आहे. नागपुरात रेशीमबाग ग्राउंड सारखा मोठा ग्राउंड कॉटन मार्केट कडे आम्ही तयार करणार आहोत व्हॉलीबॉल बास्केटबॉल सारख्या अनेक क्लब नागपूरच्या चारही बाजूला आम्ही तयार करण्याचे काम करत आहोत, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

अंबाझरीतून आंबोराला नावेतून जाण्याचे स्वप्न

मागच्या वर्षी अंबाझरीच्या ओव्हर फ्लो झाला.अंबाझरी मधून नाग नदी ओळखलं होते. त्या ठिकाणी अनेक ठिकाणी अतिक्रमण झाला होता अतिक्रमणामुळे अनेक ठिकाणी पाणी थांबत होते. त्याकरिता की नागपूर मध्ये जेव्हा ड्रेनेज सिस्टीम टाकले तेव्हा एक मजली किंवा दोन मजली होती.या सगळ्या भागामध्ये आता मोठ्या मोठ्या बिल्डिंग आणि त्याच्याकरता नाहीये, ते ड्रेनेज सिस्टम विक झाली आहे, असे सांगत त्यांनी त्यावर उपाय केल्याचे सांगितले. माझं स्वप्न आहे अंबाझरी मधून नावेत बसून मला आंबोराला जायचे आहे. आतापर्यंत मी जे बोललो ते मी केला आहे आणि हे सुद्धा करण्याचा प्रयत्न आहे, असे गडकरींनी ठासून सांगितले.

गरीब लोक फुटपाथवर खातात ते सर्व खान आरोग्यसाठी हानीकारक आहे. त्या करिता आम्ही एअर कंडिस्टनर मॉल तयार करत आहोत. तर नागपूरमध्ये रस्त्यावर वाहन उभं असले की, त्याचा फोटो पाठवा आणि 250 रुपये मिळवा अशी योजना राबवली, त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे गडकरी म्हणाले. सुरेश भट कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रमाकरिता नेहमी बुक राहतो मात्र त्याचे वीज बिल 80,000 रुपये येत होते. त्यानंतर आता सौरऊर्जा प्रकल्प बसवला. त्यामुळे वीज बिल आता पाच, दहा हजार रुपये येते असे त्यांनी सांगितले. खासदार सांस्कृतिक महोत्सव मध्ये अनेक वेळा रात्री कार्यक्रमात असतो सकाळी सातच्या विमानाने मी दिल्ली येथे जातो आणि नंतर परत मैदानावर कधी कधी बसतो.हे सर्व काम मी नाही करत हे सर्व कार्यकर्ते करत असतात ते फक्त खासदार महोत्सव माझ्या नावाने असल्याची माहिती त्यांनी दिली.

पंजाबमधून निवडणूक लढवण्याची ऑफर

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी मला तिथून निवडणूक लढवण्याची ऑफर दिल्याचे त्यांनी सांगितले. तुम्ही पंजाब मधून कुठून उभे व्हा आम्ही तुम्हाला निवडून देऊ, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे गडकरींनी स्पष्ट केले.मी अनेक लोकांना सांगितलं की नागपूर माझं जन्म ठिकाण नागपूर आहे. त्यांचे ऋण मी कधी विसरणार नाही त्याकरिता मी नेहमी नागपूरातून उभा राहील, असे गडकरींना स्पष्ट केले.

आमच्याकडे चारशे रुपये सिल्क ची साडी आहे मी हेमा मालिनी यांना धापेवाडा येथे साडी बनवणाऱ्या कंपनीत त्यांना उद्घाटनाला बोलवल्याचे त्यांनी सांगितले. राजकारणात दोन प्रकारची जाती आहे. एक बोटांनी मलम लावणारे, करून टाका असे सांगणारे आणि दुसरा ऑनरशिप घेऊन काम करणारा मी ऑनर शिप घेऊन काम करणार आहे, असे गडकरी म्हणाले. मला पंधरा डॉक्टरेट मिळाला पण कधी डॉक्टर असे नावा समोर कधी लावत नाही. मी वाशिम जिल्हा दत्तक घेतलं तेथे मी मेडिकल डिव्हाइसेस बनवणारा मोठा उद्योग टाकून अनेक युवकांना रोजगार देणार आहे. सामाजिक दायित्व म्हणून मी 90 टक्के सामाजिक कामावर भर देतो.सोशल मीडियावर ज्या प्रमाणे ट्रोलिंग होते त्याच प्रमाणे आपल्या चांगल्या कामच प्रसार होतो.

सत्ता कारण हेच राजकारण नाही समाजकारण सुद्धा आहे.निवडणुकीत एकमेका सोबत लढत असलो तरी एकमेकांचे दुश्मन नसायला पाहिजे निवडणूक संपली की आपण मित्र असलो पाहिजे. मी चांगलं क्रिकेट खेळत होतो माझी क्रिकेट पाहायला लोक सुद्धा त्याकाळात यायची एबीव्हीपी मध्ये आल्या नंतर मी क्रिकेट सोडली आणि भाषण द्यायला लागलो.आम्हाला नागपुरात पुन्हा मोठं काम करायचं आहे , नागपूर ला सुंदर स्वच्छ नागपूर करायचंआहे. त्यामुळे आता पर्यंत झालेला विकास हा पार्ट 1 होता आता पार्ट 2 बाकी आहे, अशी पुश्ती गडकरींनी जोडली.