नितीन गडकरी यांच्या विरोधात खोटी पोस्ट करणारा तो कोण?; सायबर सेलकडे करण्यात आली तक्रार

| Updated on: Mar 20, 2023 | 5:22 PM

पोलिसांनीसुद्धा या प्रकरणाला दुजोरा दिला आहे. ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यामुळे ती वादग्रस्त पोस्ट करणारा कोण, असा प्रश्न विचारला जात आहे.

नितीन गडकरी यांच्या विरोधात खोटी पोस्ट करणारा तो कोण?; सायबर सेलकडे करण्यात आली तक्रार
Follow us on

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे भाजपचे मोठे नेते आहेत. मध्यंतरी त्यांच्या कार्यालयात फोन करून खंडणी मागण्याचा प्रकार झाला होता. असाच काहीसा प्रकार आणखी झाला आहे. या प्रकरणी नितीन गडकरी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. शिवाय ट्वीट करून झालेला प्रकार सांगितला आहे. या प्रकरणाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. काय आहे हे प्रकरण ते समजून घेऊ. पोलिसांनीसुद्धा या प्रकरणाला दुजोरा दिला आहे. ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यामुळे ती वादग्रस्त पोस्ट करणारा कोण, असा प्रश्न विचारला जात आहे. या वादग्रस्त पोस्टबाबत गडकरी यांनी ट्वीट अकाउंटवरून थेट नाव सांगण्यात आलंय.

आक्षेपार्ह मेसेज पोस्ट

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या नावाने समाज माध्यमांवर खोटी पोस्ट व्हायरल करणाऱ्या व्यक्ती विरोधात नागपूर पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दिली आहे. या तक्रारीत दत्तात्रय जोशी नावाच्या व्यक्तीचा उल्लेख आहे. ती व्यक्ती महाराष्ट्रातील काही व्हॉट्सअप गृपवर, खोटा आणि आक्षेपार्ह मेसेज पोस्ट करत असल्याचे म्हंटले आहे.

हे सुद्धा वाचा

हा आहे तो व्यक्ती

दत्तात्रय जोशी नावाच्या व्यक्तीची ती पोस्ट विशिष्ट समाजाला चिथावणी देणारी आहे. त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो. त्यामुळे दत्तात्रय जोशी नावाच्या त्या व्यक्तीच्या विरोधात, तसेच त्याने पोस्ट केलेल्या मेसेजला पुढे पसरवणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात यावी. अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर पोलिसांच्या सायबर सेलकडे केली आहे.

पोलिसांनी दिला प्रकरणाला दुजोरा

नितीन गडकरी यांची अशी तक्रार आल्याच्या माहितीला नागपूर पोलिसांनी दुजोरा दिला. सध्या गडकरी यांची तक्रार मिळाली आहे. त्या प्रकरणात तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या नावाचा व्यक्ती नेमका कोण आहे. त्याने असे का केले, याचा तपास आता पोलिसांना करावा लागणार आहे. त्या व्यक्तीचा शोध लागल्यास त्याच्यावर काय कारवाई होते, हे पाहावं लागेल.