Nitin Gadkari : नागपूर महापालिकेचं तिकीट कुणाला? ज्याच्या मागं जनता त्यालाच, नितीन गडकरींचा इच्छुकांना सूचक इशारा

| Updated on: Feb 18, 2022 | 7:18 AM

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नागपूर महापालिकेत (Nagpur Municipal Corporation) ज्याच्या मागे जनता त्यालाच तिकीट मिळणार असल्याचं जाहीर केलं आहे.

Nitin Gadkari : नागपूर महापालिकेचं तिकीट कुणाला? ज्याच्या मागं जनता त्यालाच, नितीन गडकरींचा इच्छुकांना सूचक इशारा
नितीन गडकरी
Follow us on

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नागपूर महापालिकेत (Nagpur Municipal Corporation) ज्याच्या मागे जनता त्यालाच तिकीट मिळणार असल्याचं जाहीर केलं आहे. ज्याच्या मागे जनता नाही त्याला तिकीट मिळणार नाही,जनता म्हणेल त्यालाच महापालिका निवडणुकीचं तिकीट मिळणार असल्याचं नितीन गडकरींनी म्हटल्यानं इच्छुकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नितीन गडकरी यांनी यावेळी नागपूर महापालिकेअंतर्गत विकासकामांवर भर दिला. जगातील पहिल्या अनेक गोष्टी नागपुरात (Nagpur) झाल्या हे सगळं नागपूरकरांच्या आशीर्वादाने झालंय, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. नागपुरातील डबल डेकर जलकुंभ भूमीपूजनाच्या कार्यक्रमात बोलत होते. या निमित्ताने गडकरी यांनी एकप्रकारे महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकल्याची चर्चा आहे.

डबल डेकर पाण्याची टाकी हा पहिलाच प्रयोग

देशात नागपूर अस शहर आहे ज्या शहरात 24 तास पाणी मिळेल अशी योजना तयार झाली आणि अस्तित्वात आली. डबल डेकर पाण्याची टाकी हा पहिलाच प्रयोग आहे. शहरात आधी डबल डेकर पूल तयार झाला. टाकी निर्माण होत आहे मात्र अर्धा भगत लाईन टाकली अर्ध्या भागात व्हायची आहे ते पूर्ण करावं लागेल असं म्हणत, नितीन गडकरी यांनी महापालिकेचे कान पण टोचले.

कोट घेतला पण अंडर पॅन्ट बनियान नाही, असं व्हायला नको

आम्ही आधी पाण्यासाठी मोर्चे काढायचो मात्र आता गेल्या 10 वर्षात नागपुरात पाण्यासाठी मोर्चा निघाला असं दिसत नाही. पुढच्या काळात नागपूर शहराला पाण्याची समस्या जाणवणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली.आपण वीज प्रकल्पाला शहरातील वापरलेले पाणी स्वच्छ करून त्यांना देतो त्यामुळे त्यांची पाण्याची मागणी कमी झाली आणि शुद्ध पाणी वाचलं. पाणी शुद्ध करुन पैसे कमावणारी महापालिका ही पहिली महापालिका असल्याचं नितीन गडकरी म्हणाले. पुढील 25 वर्षात पाण्याची समस्या नाही निर्माण होणार नाही. पाण्याची टाकी निर्माण झाल्या असल्या तरी शेवटच्या माणसापर्यंत पाणी पोहोचेल याची व्यवस्था करा नाही तर कोट घेतला पण अंडर पॅन्ट बनियान नाही, असं होईल. शहराचा विकास सर्वांगीण झाला पाहिजे. 2014 पासून आता पर्यंत 86 हजार कोटी रुपयांची काम झाली, असं नितीन गडकरी म्हणाले.

विकासकामांचा ट्रेलर होता फिल्म अजून बाकी

जगातील सगळ्यात मोठा फाऊंटन नागपुरात उभा होत आहे. बोटॅनिकल गार्डन मध्ये फ्लावर गार्डन करायचा आहे. नागपुरात सिमेंट रस्ते केले टीका झाली मात्र त्यावर अजून खड्डे पडले नाही. सिम्बॉयसिस , एम्स सारख्या इन्स्टिट्यूट आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना मुंबई पुण्यात जावं लागत नाही. विकासाचं सगळं श्रेय जनतेला आहे. तुमच्या विश्वासामुळे विकास झाला. नागपुरात पुन्हा तुम्ही महापालिकेत आम्हाला निवडून द्याल तेव्हाच आणखी नवीन गोष्टी शहरात करता येईल. आतापर्यंत झालेली काम ही ट्रेलर होती फिल्म अजून बाकी आहे, असं नितीन गडकरी म्हणाले. 58 हजार लोकांना नागपूरच्या मिहान आणि इतर ठिकाणी काम मिळाली आहेत. काही गोष्टी अजून बाकी आहेत. त्या पूर्ण करायच्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं आहे.

इतर बातम्या

Bhandara | मोहाडी, लाखांदुरात भाजपची, तर लाखनीत राष्ट्रवादीची सत्ता; मोहाडीतील विजयी मिरवणुकीत चार नगरसेवक का अनुपस्थित?

नागपूर मनपातील स्टेशनरी घोटाळ्याचा अहवाल सादर, घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता, प्रशासनातील अधिकारी अडकणार?