AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Plantation | नागपुरातील शिवणगाव भागात मनपाचे अमृत वन, 5 हजारांवर विविध प्रजातींची झाडे

नागपूर महापालिकेच्या उद्यान विभागाद्वारे शिवणगाव भागात अमृतवन तयार करण्यात आले. 12100 चौरस मीटर जागेमध्ये 50 पेक्षा जास्त प्रजातींची पाच हजारांवर झाडे लावण्यात आली आहेत. येथे लावलेल्या झाडांची तीन वर्षात चांगलीच वाढ झाली आहे.

Nagpur Plantation | नागपुरातील शिवणगाव भागात मनपाचे अमृत वन, 5 हजारांवर विविध प्रजातींची झाडे
शिवणगाव परिसरातील उद्यानाची पाहणी करताना मनपा आयुक्त व अधिकारी.Image Credit source: t v 9
| Updated on: May 14, 2022 | 9:54 AM
Share

नागपूर : वाढत्या शहरीकरणातही नागपूर शहराची हिरवे नागपूर, सुंदर नागपूर ही ओळख अबाधित ठेवण्यात नागपूर महापालिका सदैव प्रयत्नरत् आहे. नागपूर शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करून झाडांची संख्या वाढविली जात आहे. त्यामुळे शहरात हिरवळ वाढत आहे. शिवाय नागरिकांना शुद्ध ऑक्सिजन सुद्धा मिळत आहे. याच कार्याच्या श्रृंखलेत मनपाच्या उद्यान विभागाने केलेल्या स्तुत्य कार्याचे फलीत मिळाले आहे. शिवणगाव भागात तीन वर्षापूर्वी उद्यान विभागाद्वारे (Horticulture Department) करण्यात आलेल्या वृक्षलागवडीने (Tree Plantation) परिसरात मोठे अमृत वन निर्माण झाले आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. (Radhakrishnan b.) यांनी वेळोवेळी या उद्यानासंदर्भात आढावा घेतला. येथील देखरेख आणि व्यवस्थापनाकडे लक्ष दिले आहे. त्यांच्या निर्देशानुसार उद्यान विभागाद्वारे आवश्यक कार्यवाही करून सदर उद्यान आज वनआच्छादन म्हणून निर्माण होत आहे. नुकतेच मनपा आयुक्तांनी सदर उद्यानाची पाहणी केली. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, उपायुक्त रविन्द्र भेलावे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार उपस्थित होते.

फुलझाडांसोबत फळझाडेही

नागपूर महापालिकेच्या उद्यान विभागाद्वारे शिवणगाव भागात अमृतवन तयार करण्यात आले. 12100 चौरस मीटर जागेमध्ये 50 पेक्षा जास्त प्रजातींची पाच हजारांवर झाडे लावण्यात आली आहेत. येथे लावलेल्या झाडांची तीन वर्षात चांगलीच वाढ झाली आहे. येणा-या काळात हा संपूर्ण परिसर विविध प्रकारची फुलझाडे, फळझाडांनी बहरून निघणार आहे. शिवाय येथील वृक्ष मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती करून सभोवतालचे वातावरण आल्हाददायी करण्यात महत्वाची भूमिका निभावणार आहेत. शिवणगाव भागातील या उद्यानाच्या प्रवेश मार्गावर आकर्षक पद्धतीने पाम आणि विद्येच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. याशिवाय बाजूलाच चाफा, कनक चाफा, डिस्मेरियन पाम, जास्वंद, गुलाब अशी विविध फुलांची झाडे लक्ष वेधून घेत या भागाच्या सौंदर्यात भर घालतात. उद्यानात मोठ्या प्रमाणात पिंपळ, आपटा, कदंब, कडूनिंबाची झाडे लावण्यात आलेली आहेत. रामफळ, आंबा, चिकु, डाळींब, पेरू, सीताफळ, बोर, जांभुळ अशी बरीच फळझाडे सुद्धा लावण्यात आलेली आहेत.

पशु-पक्ष्यांसाठी मोठा निवारा

परिसरात निर्माण झालेल्या फळ आणि फुलझाडांच्या वनआच्छादनाने परिसरात पशु, पक्ष्यांसाठी मोठा निवारा निर्माण केला आहे. उद्यानात खारुताईच्या मुक्त संचारासोबतच झाडांवर विविध पक्ष्यांची घरटी दिसून येतात. पक्ष्यांचा किलबिलाट हा सुखावय अनुभव देतो. लाफींग डव, बुलबुल, ग्रीन बी ईटर, सनबर्ड, लार्ज ग्रे बॅबलर, इंडियन लाबिंग यासारखे अनेक पक्षी तसेच मोर हा राष्ट्रीय पक्षी सुध्दा येथे दिसून येतात. भागात लावण्यात आलेली फुलझाडे, फळझाडे बहरल्यानंतर या परिसरात आणखी पक्ष्यांची संख्या वाढून हे स्थळ पक्ष्यांसाठी नंदनवनच ठरेल, अशी आशा उद्यान विभागाद्वारे वर्तविण्यात आली आहे.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.