राजकीय संन्यास घेण्याची गरज नाही, जनताच त्यांना संन्यास घ्यायला लावेल; मुनगंटीवारांचा पलटवार

| Updated on: Sep 05, 2021 | 4:44 PM

शरद पवार यांनी खंजीर खुपसल्याचं एक उदाहरण दाखवा मी राजकारण सोडेन, असं जाहीर आव्हान शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना केलं होतं. (sudhir mungantiwar attacks sanjay raut to his comments)

राजकीय संन्यास घेण्याची गरज नाही, जनताच त्यांना संन्यास घ्यायला लावेल; मुनगंटीवारांचा पलटवार
सुधीर मुनगंटीवार, संजय राऊत
Follow us on

नागपूर: शरद पवार यांनी खंजीर खुपसल्याचं एक उदाहरण दाखवा मी राजकारण सोडेन, असं जाहीर आव्हान शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना केलं होतं. त्यावर भाजपचने नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पलटावर केला आहे. तुम्हाला राजकीय संन्यास घेण्याची गरज नाही. जनताच तुम्हाला संन्यास घ्यायला लावेल, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे. (sudhir mungantiwar attacks sanjay raut to his comments)

सुधीर मुनगंटीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना हा पलटवार केला आहे. हातात खंजीर घेतला आणि तो खूपसला असा खंजीर खुपसणे याचा शब्दशः अर्थ होत नाही. त्यामुळे चुकीचा अर्थ काढू नये. भाजप आपल्या शिवाय सरकार स्थापन करू शकत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी कपोकल्पित गोष्टी समोर आणल्या. त्यांनी बेईमानीचं बीज रोवलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची काँग्रेसबद्दल टोकाची भूमिका होती. तरी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेली. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी युती तोडली. त्यांना राजकीय संन्यास घ्यायची गरज नाही. जनताच त्यांना संन्यास घ्यायला लावेल, असं मुनगंटीवार म्हणाले.

राऊत माफी मागा

भाजपला कोरोना झाला म्हणून ते सत्तेतून गेले, असं राऊत म्हणाले होते. त्यावरही मुनंगटीवार यांनी प्रतिक्रिया दिली. या विधानाबद्दल राऊतांनी सपशेल माफी मागितली पाहिजे. राऊतांनी या विधानातून कोरोना झालेल्या लोकांचा अवमान केला आहे. त्यांच्या पक्षातील लोकांना आणि सहयोगी पक्षांना कोरोना झाला म्हणजे त्यांनी पाप केलं का?, असा सवालही त्यांनी केला.

दारूवर एवढं प्रेम का?

मुख्यमंत्री म्हणतात त्याप्रमाणे कोरोना विरोधात आंदोलन करू. आम्ही साथ देऊ. पण ज्या प्रमाणे मंदिर बंद आहे, त्याप्रमाणे दारूची दुकान बंद करा. तुम्हाला दारूच्या दुकानावर एवढं का प्रेम आहे? त्या ठिकाणी गर्दी होत नाही का? त्या ठिकाणी कोरोना पसरत नाही का? मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाऊन बघावं बारमध्ये किती गर्दी आहे. यांना कोरोनाच्या तारखा माहीत आहे का? मंदिरे सुरू करायची नाही तर नका करू. पण कारण तर योग्य द्या. देवाच शिष्टमंडळ भेटायला येऊ शकत नाही म्हणून ते बंद. पण ते शिष्ट मडळ आलं तर महागात पडेल, असा इशाराही त्यांनी दिला.

पेंग्विनसाठी मंत्र्यांचे पगार कापा

महापालिका पेंग्विनसाठी मोठा खर्च करणार आहे. त्यावरही त्यांनी टीका केली. पेंग्विनसाठी किती खर्च करायचा तेवढा करा. मात्र जनतेच्या आरोग्यासाठी काही तरी खर्च करा. एकीकडे कोरोना संकटात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार दिले जात नाही. कंत्राटी कर्मचाऱ्यांना संकट काळात नोकरीवरून काढलं जात आणि इकडे एवढा खर्च केला जात आहे. पेंग्विनला वाचवायचं आहे तर मंत्र्यांचा सहा महिन्यांचा पगार कापण्याचा मंत्रिमंडळात ठरवा करा. पण जनतेला वाचवण्यासाठी हे पैसे द्या, असं आवाहन त्यांनी केलं. (sudhir mungantiwar attacks sanjay raut to his comments)

 

संबंधित बातम्या:

शरद पवारांनी खंजीर खूपसल्याचं एक उदाहरण दाखवा, मी राजकारण सोडतो; राऊतांचं चंद्रकांतदादांना ओपन चॅलेंज

दुकाने चालवा, पैसे कमवा, बरं चाललंय सरकारचं, सरकारलाच आता निवडणुका नकोय; राज ठाकरेंचा हल्लाबोल

Kisan Mahapanchayat : कृषी कायद्यांविरोधात शेतकरी पुन्हा आक्रमक, विविध मागण्यांसाठी 27 सप्टेंबरला भारत बंद, राकेश टिकैत यांची घोषणा

(sudhir mungantiwar attacks sanjay raut to his comments)