Swarajya Mahotsav : नागपूर शहरात स्वराज्य महोत्सव, मनपा मुख्यालयात अधिकारी कर्मचा-यांचे सामूहिक राष्ट्रगीत गायन

| Updated on: Aug 18, 2022 | 2:39 AM

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने स्वराज्य महोत्सव राबविण्यात आला. या महोत्सवांतर्गत बुधवारी सकाळी 11 वाजता सर्वत्र सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले.

Swarajya Mahotsav : नागपूर शहरात स्वराज्य महोत्सव, मनपा मुख्यालयात अधिकारी कर्मचा-यांचे सामूहिक राष्ट्रगीत गायन
मनपा मुख्यालयात अधिकारी कर्मचा-यांचे सामूहिक राष्ट्रगीत गायन
Follow us on

नागपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या निर्देशानुसार आयोजित ‘स्वराज्य महोत्सव’ अंतर्गत बुधवारी सकाळी 11 वाजता संपूर्ण नागपूर शहरात सामूहिक राष्ट्रगीत म्हणण्यात आले. मनपा मुख्यालयात (Municipal Corporation Headquarters) छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) प्रशासकीय इमारतीतील दालनात सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक राष्ट्रगीत गायले. नागपूर स्मार्ट सिटीव्दारे (Nagpur Smart City) 51 चौकात सिग्नलवर लावलेल्या ध्वनी प्रक्षेपणावर सकाळी 11 वाजता राष्ट्रगीत सुरु होताच नागरिकांनी उभे राहून राष्ट्रगीत गायले. राष्ट्रगीतबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.

या अधिकाऱ्यांचा सहभाग

मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन. बी, नागपूर स्मार्ट सिटीचे सीईओ चिन्मय गोतमारे, अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, राम जोशी, मुख्य अभियंता प्रदीप खवले, उपायुक्त सर्वश्री निर्भय जैन, रवींद्र भेलावे, मिलींद मेश्राम, डॉ. गजेन्द्र महल्ले, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेन्द्र उचके, सहायक आयुक्त सर्वश्री. महेश धामेचा, प्रकाश वराडे, कार्यकारी अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, क्रीडा अधिकारी पियुष आंबुलकर यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामूहिक राष्ट्रगीत गायनात सहभाग नोंदविला. मनपा शिक्षण विभागाच्या चमुव्दारे कलसिया यांच्या नेतृत्वातील बँड पथकाच्या तालावर राष्ट्रगीत व देशभक्ती गीत सादर केले.

या ठिकाणी झाले सामूहिक गायन

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने स्वराज्य महोत्सव राबविण्यात आला. या महोत्सवांतर्गत बुधवारी सकाळी 11 वाजता सर्वत्र सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले. नागपूर शहरातील सर्व शासकीय कार्यालये, मनपा झोनल कार्यालय, शाळा, महाविद्यालये, बस स्थानक, वाहतूक सिग्नल व अन्य ठिकाणी एकाचवेळी सामूहिक राष्ट्रगीत गायन झाले. वाहतूक सिग्नलवर उभे असलेल्या नागरिकांनी राष्ट्रगीत सुरू होताच वाहने स्टँडवर लावून, वाहनांमधून बाहेर निघून राष्ट्रगीत म्हटले.

हे सुद्धा वाचा