Nagpur Swine flu : नागपुरात स्वाईन फ्लूने वाढविली चिंता; मृतांची संख्या 20 वर पोहचली; रुग्णांची संख्या 337

सुनील ढगे

सुनील ढगे | Edited By: महादेव कांबळे, Tv9 मराठी

Updated on: Aug 31, 2022 | 7:55 AM

स्वाईन फ्लूची साथ वाढली असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्वाईन फ्लूबाबत झालेल्या लेखापरीक्षणाच्या बैठकीत 15 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली असून आतापर्यंत मृतांची संख्या 20 वर पोहचली असल्याचे सांगण्यात येत आहे.

Nagpur Swine flu : नागपुरात स्वाईन फ्लूने वाढविली चिंता; मृतांची संख्या 20 वर पोहचली; रुग्णांची संख्या 337
प्रातिनिधिक फोटो...

नागपूरः कोरोनाचे (Corona) संकट सुरू असतानाच नागपूरवर मात्र स्वाईन फ्लूचे (Swine flu) दुहेरी संकट ओढावले आहे. कोरोनाने सारे जग हैराण झालेले असतानाच नागपूर शहरात मात्र स्वाईन फ्लूने चिंता वाढविली आहे. सणासुदीच्या दिवसात स्वाईन फ्लूने डोकं वर काढल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य विभागावरचाही ताण प्रचंड वाढला आहे. स्वाईन फ्लूची साथ वाढली असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्वाईन फ्लूबाबत झालेल्या लेखापरीक्षणाच्या बैठकीत 15 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली असून आतापर्यंत मृतांची संख्या 20 वर पोहचली असल्याचे सांगण्यात येत आहे. स्वाईन फ्लूची रुग्णसंख्याही वाढली असून रुग्णांनाची संख्या 337 वर पोहचली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नागपूर शहरासह परिसरात (Nagpur city and District) आरोग्याची समस्या तीव्र बनली आहे. आरोग्याची समस्या चालू असतानाच पावसाचे प्रमाणही वाढले होते, त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कोरोनाबरोबरच स्वाईन फ्लूचा प्रभाव वाढल्याने अनेक नागरिक चिंताग्रस्त झाले आहे.

नागपूर शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणात स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढले असल्याने नागरिकही चिंताग्रस्त झाले आहेत. स्वाईन फ्लूमुळे ज्या 15 जणांचा मृत्यू झाला आहे, त्यामध्ये शहरातीली 4 आणि ग्रामीण भागातील 2 तर मध्य प्रदेशमधील 5 आणि बाकी इतर जिल्ह्यातील असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

नागपूरची रुग्णसंख्या 337

गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे, त्यामुळे आरोग्याच्या समस्याही प्रचंड वाढल्या आहेत. कोरोनाचे संकट चालू असतानाच स्वाईन फ्लूने डोके वर काढल्यानं लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून आरोग्याची समस्या वाढली असल्याने रुग्णांनाची संख्या 337 वर पोहचली आहे, त्यामुळे आरोग्य विभागाकडून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

औषध फवारणीची मागणी

गेल्या अनेक दिवसांपासून नागपूर शहरात आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे नागपूर शहरातील अनेक परिसरात औषधांची फवारणी करावी अशी मागणीही करण्यात येत आहे.

साथीच्या रोगांचा प्रादूर्भाव वाढला

गटारी तुंबल्यामुळे डासांची पैदास वाढली आहे. त्यामुळे साथीच्या रोगांचाही प्रादूर्भाव वाढला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून स्वच्छता आणि औषध फवारणी करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI