कोकणात जाताना गणेश भक्तांच्या एसटीला अपघात, तर चिखलदऱ्यात 100 फूट दरीत कार कोसळली; एकूण 5 ठार

राज्यात आज दोन वेगवेगळ्या अपघातात चार जण ठार झाले आहेत. तर 24 जण जखमी झाले आहेत. हे दोन्ही अपघात अत्यंत भीषण होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत मदतकार्यास सुरुवात केली होती.

कोकणात जाताना गणेश भक्तांच्या एसटीला अपघात, तर चिखलदऱ्यात 100 फूट दरीत कार कोसळली; एकूण 5 ठार
terrible accidentImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 17, 2023 | 12:02 PM

राजापूर | 17 सप्टेंबर 2023 : राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरू असताना आणि चाकरमानी गावाकडे गणेशोत्सावासाठी जात असतानाच एक दु:खद बातमी समोर आली आहे. कोकणात गणेशोत्सावासाठी जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकजण ठार झाला आहे. तर 20 जण जखमी झाले आहेत. तर, अमरावती जिल्ह्याच्या चिखलदरा येथे पर्यटकांची कार 100 फूट खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. तर चारजण जखमी झाले. आज झालेल्या दोन्ही अपघातात मिळून एकूण 4 जण ठार झाले असून 24 जण जखमी झाले आहेत.

गणेशोत्सवासाठी चाकरमानी एसटीने कोकणात चालले होते. राजापूरला जाणाऱ्या बसमध्ये हे लोक बसले होते. गणेश भक्तांच्या या बसला मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रेपोली येथे आज पहाटे 4.30 वाजता भीषण अपघात झाला. या एसटीला ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका भाविकाचा मृत्यू झाला आहे. विनोद पांडुरंग तागडे असं या व्यक्तीचं नाव आहे. या अपघातात एकूण 20 जण जखमी झाले आहेत. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

माणगावमध्ये उपचार सुरू

रायगड जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेपोली येथे हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना बसमधून बाहेर काढलं. यावेळी माणगाव आणि गोरेगाव पोलिसांनाही तात्काळ माहिती देण्यात आली. गोरेगाव आणि माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठवलं. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून या अपघाताची चौकशी सुरू केली आहे.

अपघातातील जखमी

ज्ञानदेव हरी जाधव, प्रमोद अशोक मयेकर, संजय शशिकांत बिरजे, प्रमिला प्रभाकर घाडे, मनोहर मुकुंद मुलाम, श्वेता शशिकाम बिरजे, युवहान बाबुराव बनसोडे , आराध्या शशिकांत बिरजे, महेश रमेश मुंडेकर, उज्वला बाळाराम कांबळे, राकेश विठ्ठल मारे, अर्थव विनोद तारले, वैष्णवी विनोद तारले, मंगला गंगाराम बावदाणे, विनोद तारले, नेहा अनंत आंबेरकर, विनोद अनंत आंबेरकर, तुकाराम परशुराम घाडी, तन्मय विनोद आंबेरकर, शुभम प्रभोद मयेकर, प्रियंका प्रमोद मयेकर, किर्ती विनायक पुरोहित, ईश्वरी विनोद तारले, दिप्ती दिनेश तारले, धनश्री चंद्रकांत पांगेरकर, अक्षय अनंत घाडी, अंकिता चंद्रकांत नागव, अविता चंद्रकात नागम, चंद्रकांत विजय पंगेनरकर, धनश्री चंद्रकांत पंगेनरकर, मानवी चंद्रकांत पंगेनरकर, आदित्य वासुदेव घडी, सिधिका शशिकांत बिरजे, विवेक चंद्रकांत पंगेनकर इत्यादी.

अमरावतीत चौघे ठार

दरम्यान, अमरावतीतही अत्यंत भीषण अपघात झाला आहे. चिखलदरा येथे पर्यटकांच्या चारचाकी वाहनाला हा अपघात झाला आहे. परतवाडा ते चिखलदरा मार्गावर मोथा गावाजवळ एक कार खोल दरीत कोसळली आहे. कार अनियंत्रित झाल्याने ती 100 फुटापेक्षा खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व मृतक आणि जखमी आंध्रप्रदेशातील असल्याचं सांगितलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केलं आहे.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.