Omicron| नागपुरातल्या ओमिक्रॉन बाधितानं घेतली नव्हती लस; एम्सच्या विशेष खोलीत उपचार

| Updated on: Dec 13, 2021 | 5:54 AM

ओमिक्रॅानबाधित रुग्णाला एप्रिल 2021 मध्ये कोरोनाची लागण झाली होती. कंपनीच्या कामानिमित्त त्यांना आफ्रिकेत जावे लागले. ओमिक्रॅानबाधिताच्या परिवारातील सदस्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत. दिल्लीवरुन नागपुरात येताना विमानातील सहप्रवाशांचा शोध सुरू करण्यात आलाय.

Omicron| नागपुरातल्या ओमिक्रॉन बाधितानं घेतली नव्हती लस; एम्सच्या विशेष खोलीत उपचार
OMICRON
Follow us on

नागपूर : नागपुरात सापडलेल्या ओमिक्रॅान बाधित रुग्णाने लस घेतली नसल्याचं समोर आलंय. पश्चिम आफ्रिकेतील बुर्कीना फासोतून 5 डिसेंबरला हा रुग्ण नागपुरात आला. नागपूर एम्सच्या विशेष खोलीत विदर्भातील पहिल्या ओमिक्रॅानबाधित रुग्णावर उपचार सुरू आहेत.

ओमिक्रॅानबाधित रुग्णाला एप्रिल 2021 मध्ये कोरोनाची लागण झाली होती. कंपनीच्या कामानिमित्त त्यांना आफ्रिकेत जावे लागले. ओमिक्रॅानबाधिताच्या परिवारातील सदस्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत. दिल्लीवरुन नागपुरात येताना विमानातील सहप्रवाशांचा शोध सुरू करण्यात आलाय.

नागपूर जिल्ह्यात 80 कोरोनाबाधित सक्रिय

नागपूर जिल्ह्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 80 च्या खाली आहे. गेल्या 24 तासांत चार नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. 3947 जणांच्या कोरोना चाचण्यांमधून चार जण आले पॅाझिटिव्ह आलेत. गेल्या 24 तासांत जिल्ह्यातील 12 कोरोना रुग्ण बरे झाले. ओमिक्रॅानचा रुग्ण आढळल्याने नागपूर जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे.

ओमिक्रॉन बधितामध्ये लक्षण नाहीत

नागपूरमध्ये 5 डिसेंबर रोजी पश्चिम आफ्रिकेहून आलेल्या एका रुग्णाचा जिनोम सिक्वेन्सिंग अहवाल सकारात्मक आढळून आला आहे, अशी माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली. 5 डिसेंबर रोजी नागपुरात आलेल्या प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. सकारात्मक अहवाल आलेल्या रुग्णाची रिपोर्ट जिनोम सिक्वेंसिंगसाठी पुणे एनआईवीमध्ये पाठविण्यात आला होता. त्या अहवालातील एका रुग्णाला ओमिक्रॉन असल्याचे आढळून आले. आयुक्तांनी सांगितले की, या रुग्णांवर एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती उत्तम आहे. तसेच 40 वर्षीय ओमिक्रॉन बधितामध्ये कोणतेही लक्षण नाहीत. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांची सुद्धा तपासणी करण्यात आली.

घाबरू नका, काळजी घ्या

ओमिक्रॉनचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी सर्व कोव्हिड नियमांचे पालन करावे, मास्क, शारीरिक अंतर आणि हात वेळोवेळी सॅनिटायजर करीत राहण्याचे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सर्व नागपूरकरांना केले आहे. तसेच ज्या व्यक्तींना सर्दी, खोकला आहे अशांनी त्वरित तपासणी करून घ्यावी. सोबतच अजूनही लस न घेतलेल्या व्यक्तींनी लस घेण्यासाठी पुढे यावे. ज्यांनी पहिला डोज घेतला आहे आणि 84 दिवस झाले आहे त्यांनी लवकर दुसरा डोज घ्यावा, असे आवाहनही मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

Nagpur Omicron | ओमिक्रॉन धडकला; धडधड वाढली, परदेशातून आलेला रुग्ण पॉझिटिव्ह

नागपूरकरांसाठी 17 डिसेंबरपासून सांस्कृतिक मेजवाणी, खासदार महोत्सवाचा प्रोमो लाँच

Nagpur Tiger | तीन पिल्लांसह वाघीण बघीतली का? चला उमरेड करांडला अभयारण्यात