Nagpur Crime | रामटेकमधील दुहेरी खुनाचे रहस्य उलगडले; कुऱ्हाडीने वार करून फेकले होते, नेमकं काय घडलं?

नागपूर जिल्हातील रामटेक पोलिसांनी एका दुहेरी अतिशय क्लिष्ट हत्याकांडाचा खुलासा करत चार आरोपींना अटक केली आहे. अटक आरोपींमध्ये दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे.

Nagpur Crime | रामटेकमधील दुहेरी खुनाचे रहस्य उलगडले; कुऱ्हाडीने वार करून फेकले होते, नेमकं काय घडलं?
चोरीचा उलगडा करणारे रामटेकचे पोलीस
| Edited By: | Updated on: Jan 22, 2022 | 5:18 AM

नागपूर : अनैतिक संबंधांची माहिती आत्याने भाचीच्या पतीला दिल्याचा राग आला. या रागातून भाचीने प्रियकराच्या मदतीने आत्यासह दोघांची हत्या (Double Murder) केल्याचा खुलासा झाला आहे. या प्रकरणात रामटेक पोलिसांनी (Ramtek Police) आरोपी भाची रितू बागबांदे आणि तिचा प्रियकर महेश भय्यालाल नागपुरे यांना अटक केली आहे. याशिवाय आणखी दोन अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जयवंता भगत आणि संदीप मिश्रा (Sandeep Mishra) असे मृतकांचे नावं आहेत. संदीप हा जयवंताचा मानलेला भाऊ होता. सहा वर्षांपासून जयवंता आणि संदीप हे दोघेही रामटेकमधील एका शेतात काम करायचे. कुटुंबासह शेतातच राहात होते. दोन महिन्यांपूर्वी जयवंता भगत यांची भाची रितू रामटेकला आली. त्याच्या मागोमाग तिचा प्रियकर महेश हा देखील रामटेकला आला. ते दोघेही दुसऱ्या शेतात काम करायचे. या दरम्यान जयवंता यांना रितू आणि महेश यांच्या प्रेम प्रकरणाची कुणकुण लागली होती. त्यांनी याची माहिती रितूच्या पतीला दिली. पत्नीच्या अनैतिक संबंधांची माहिती समजताच रितूच्या पतीने रामटेक येथे जाऊन तिच्यासोबत वाद घातला. तिला घेऊन निघून गेला.

असा केला गेम

दोन दिवसांपूर्वी आरोपी रितू आणि महेश दोन अल्पवयीन साथीदारांना घेऊन कारने रामटेकला आले. त्यांनी संदीप व जयवंता या दोघांना बळजबरीने कारमध्ये बसविले. काही अंतरावर नेऊन महेशने कुऱ्हाडीने वार करून संदीप यांचा खून केला. संदीपचा मृतदेह रामटेकमधील जंगलात फेकल्यानंतर आरोपींनी जयवंता यांची हत्या केली. जयवंता यांचा मृतदेह भंडारा जवळ फेकून आरोपींनी पळ काढला होता.

असा झाला खुनाचा उलगडा

दोन दिवसांनंतर रामटेक पोलिसांना एका इसमाचा मृतदेह रामटेकच्या जंगलात आढळला. पोलिसांनी तपास सुरू केला असता तो मृतदेह संदीप मिश्रा यांचा असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी सखोल माहिती घेतली असता जयवंता देखील बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. त्यानंतर पोलिसांनी जयवंताचा शोध सुरू केला. तेव्हा त्यांचा मृतदेह भंडाराजवळ आढळून आला. जयवंताच्या मुलीने संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला. त्याच्या आधारे पोलिसांनी रितूला मध्यप्रदेश बालाघाटमधून अटक केली आहे. याशिवाय तिचा प्रियकर महेश आणि अन्य दोन अल्पवयीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Nagpur Crime | नागपुरात तीन दिवसांपूर्वी घरफोडी केली; बारमध्ये नशेत बरडले नि कसे आले पोलिसांच्या जाळ्यात?

असेही पशुप्रेम! कुत्रीसह दोन पिल्ले मध्यरात्री पडली विहिरीत; मलकापुरातील पशुप्रेमींनी रातोरात कसे काढले बाहेर?

Dam water| आनंदाची बातमी! राज्यात यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई नाही; जाणून घ्या धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती