Video | नागपुरात चट मंगनी, पट ब्याह! दहा मिनिटांत नोंदणी; अर्ध्या तासात लग्न, कसे ते वाचा

Video | नागपुरात चट मंगनी, पट ब्याह! दहा मिनिटांत नोंदणी; अर्ध्या तासात लग्न, कसे ते वाचा
प्रातिनिधीक फोटो

लग्न म्हटलं की बँड बाजा आणि बारात आलेच. पण, कोरोनामुळं हा ट्रेंड लोप पावतोय. दहा मिनिटांत नोंदणी, आणि अर्ध्या तासांत लग्न. हा नवा ट्रेंड कोरोनामुळं आलाय. कसा ते वाचा.

गजानन उमाटे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 21, 2022 | 10:17 AM

नागपूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहेत. रोजची रुग्णसंख्या साडेचार हजारच्या उंबरठ्यावर गेलीय. त्यामुळेच नागपूर जिल्ह्यात तरुणांमध्ये शॅार्टकट मॅरेजचा ट्रेंड वाढतोय. ना बॅंडबाजा, ना बारात, ना घोडा, ना मनपाच्या कारवाईचं टेन्शन… दहा मिनिटांत लग्नाची नोंदणी आणि अर्ध्या तासांत शुभमंगल… असं शॅार्टकट लग्न उरकणाऱ्यांची संख्या नागपुरात वाढलीय. गेल्या वीस दिवसांत नागपुरात सव्वादोनशे पेक्षा जास्त जोडण्यांनी कोर्टमॅरेज करत शॅार्टकट लग्न उरकलंय.

झाडाखालीच घातले फुलांचे हार

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे नागपुरातील सलील आणि ईश्वरी यांनी शॅार्टकट मॅरेजचा पर्याय निवडत कोर्टमॅरेज केलंय. सलील मोठ्या कंपनीत इंजिनिअर आहे, तर ईश्वरी आर्किटेक्ट. कोरोना वाढू नये म्हणून सरकारने लग्नात पन्नास पाहुण्यांची मर्यादा घालून दिलीय. सलील आणि ईश्वरी यांनी सरकारी निर्बंधांचं तंतोतंत पालन करत. 42 पाहुणे, दहा मिनिटांत लग्नाची नोंदणी आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसर झाडाच्या खाली एकमेकांना फुलाचा हार घालत, शुभमंगल सावधान केलं. आणि वाढत्या कोरोनापासून इतरांनाही सावधान होण्याचा सल्ला .

कोरोना निर्बंधांचा परिणाम

कोरोना निर्बंधांमुळे नागपुरात सलील आणि इश्वरी यांनीच शॅार्टकट विवाहाचा निर्णय घेतला असं नाही, तर गेल्या वीस दिवसांत नागपुरातील सव्वादोनशेपेक्षा जास्त जोडप्यांनी अशाचप्रकारे आपलं लग्न उरकलं. वैभव पाटील हे त्यापैकीच एक. निसर्गाच्या सानिध्यात एक दुसऱ्याला हार घालत दहा मिनिटांत त्यांचंही शुभमंगल झाल्याची माहिती विवाह नोंदणी निबंधक सीमा वालदे यांनी दिली. नागपुरात एकीकडे सरकारी निर्बंध धाब्यावर बसवत लॅानमध्ये लग्न करणारे जोडपेही आहेत. तर दुसरीकडे कोरोनाच्या संकटात सरकारी नियमांचं काटेकोर पालन करत, समाजासमोर आदर्श घालून देणारे जोडपे हे जोडपे. या जोडप्यांचं समाजाने कौतुक करायला हवं.

Dam water| आनंदाची बातमी! राज्यात यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई नाही; धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा

Chandrasekhar Bavankule | पटोलेंवर गुन्हा दाखल करावा, यासाठी आंदोलन करणाऱ्या बावनकुळेंवर गुन्हा; कोविड सूचनांचे उल्लंघन केले?

Gadchiroli Election | धर्मरावबाबा, अमरीशरावांच्या अहेरीत आदिवासी विद्यार्थी संघटनेची एंट्री, महाविकास आघाडीचे वर्चस्व

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें