AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युवा सेनेचं मिशन विदर्भ, वरुण सरदेसाई महिनाभरात दुसऱ्यांदा नागपुरात

युवा सेनेचं काम राज्यात जोरदार सुरु आहे युवा सेनेचे राष्ट्रीय सचिव वरुण सरदेसाई यांचे राज्यभरात दौरे सुरु आहेत. वरुण सरदेसाई यांनी महिनाभरात नागपूरला दुसऱ्यांदा भेट दिली आहे.

युवा सेनेचं मिशन विदर्भ, वरुण सरदेसाई महिनाभरात दुसऱ्यांदा नागपुरात
वरुण सरदेसाई
| Edited By: | Updated on: Aug 19, 2021 | 4:43 PM
Share

नागपूर: युवा सेनेचं काम राज्यात जोरदार सुरु आहे युवा सेनेचे राष्ट्रीय सचिव वरुण सरदेसाई यांचे राज्यभरात दौरे सुरु आहेत. वरुण सरदेसाई यांनी महिनाभरात नागपूरला दुसऱ्यांदा भेट दिली आहे. युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात नागपूरता संघटनात्मक बैठक घेण्यात येणार आहे. सरदेसाई यांनी असून मागील दौऱ्यात दिलेल्या सूचनांची पूर्णतः झाली की नाही याचा घेणार आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे, अशी माहिती दिली आहे.

नागपूरच्या युवा सेने मध्ये गटबाजी असल्याचं सुद्धा पुढे येत होतं मात्र त्यावर पडदा टाकत युवा सेनेत कुठलीही गटबाजी नसल्याचं वरून सरदेसाई यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसा पूर्वी सुद्धा त्यांनी विदर्भाचा दौरा केला होता आणि युवा सेनेत काही बदल सुद्धा केले होते. त्याचा पुढचा भाग म्हणून हा दौरा असून मागच्या दौऱ्यात काही सूचना देण्यात आल्या होत्या त्या पूर्ण झाल्या की नाही. संघटना मजबूत करण्यासाठी आणखी काय करायला पाहिजे याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार असून संपूर्ण पूर्व विदर्भात दौरा करून घेणार बैठका घेणार असल्याच वरून सरदेसाई यांनी सांगितलं.

चांगलं काम करणाऱ्यांना युवा सेनेत प्राधान्य

वरुण सरदेसाई यांनी जुलै महिन्यात नागपूर दौरा केला होता. युवा सेनेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांवर गुन्हे असतील किंवा रेकॉर्ड खराब असल्याचं पुढं आले तर त्यांच्यावर कारवाई होईल,असं सरदेसाई यांनी सांगितलं होतं. युवा सेनेत स्थानिक पातळी वर अनेक बदल होणार आहे. चांगलंकाम करणाऱ्यांना प्राधान्य मिळेल असं युवा सेनेचे राष्ट्रीय सचिव वरुण सरदेसाई यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं होतं.

युवा सेनेची प्रभागनिहाय बांधणी

युवा सेनेची प्रभाग निहाय बांधणी व्हावी यासाठी युवा सेना विस्तार आणि बांधणी करण्यात येणार आहे. नागपूर महापालिका निवडणुकीत सुद्धा युवा सेने ला मोठं काम करायचं आहे. निवडणुका कशा लढवयाच्या एकटे की युती हा निर्णय पक्ष प्रमुख घेतात. आम्ही सगळी तयारी सुरू केली, असल्याचं वरुण सरदेसाई म्हणाले. विदर्भात युवा सेना बळकट करण्याच्या दृष्टीनं वरुण सरदेसाईंचे दौरे महत्वाचे ठरणार का हे येणाऱ्या काळात पाहायला मिळेल.

इतर बातम्या:

VIDEO : सोन्याच्या बिस्किटांचे आमिष देवून महिलेच्या अंगावरील दागिने पळवले, घटना सीसीटीव्हीत कैद

गोपीचंद पडळकरांच्या आरोपानंतर एमपीएससी आयोगाचं परिपत्रक, पदसंख्या आणि आरक्षित जागांचा विषय राज्य सरकारचा

Varun Sardesai visit Nagpur for meeting of Yuva Sena

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.