गोपीचंद पडळकरांच्या आरोपानंतर एमपीएससी आयोगाचं परिपत्रक, पदसंख्या आणि आरक्षित जागांचा विषय राज्य सरकारचा

MPSC आयोगामार्फत राज्यातील भरल्या जाणाऱ्या जागांमध्ये बिंदू नामावलीनुसार धनगर समाजाला 3.5 टक्के आरक्षित जागा द्या. बिंदू नामावलीनुसार धनगर समाजातील विद्यार्थ्यांना जागा दिल्या नाहीत तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार, असं सांगत भाजप आमदार गोपीचंद पडळकरही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. पडळकरांच्या इशाऱ्यानंतर आता एमपीएससी आयोगानं एक परिपत्रक काढलं आहे.

गोपीचंद पडळकरांच्या आरोपानंतर एमपीएससी आयोगाचं परिपत्रक, पदसंख्या आणि आरक्षित जागांचा विषय राज्य सरकारचा
गोपीचंद पडळकर यांच्या इशाऱ्यानंतर एमपीएससीचं परिपत्रक


पुणे : पीएसआयच्या भरतीत अवघ्या तीनच जागा दिल्याने धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी एमपीएससी आयोगाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर MPSC आयोगामार्फत राज्यातील भरल्या जाणाऱ्या जागांमध्ये बिंदू नामावलीनुसार धनगर समाजाला 3.5 टक्के आरक्षित जागा द्या. बिंदू नामावलीनुसार धनगर समाजातील विद्यार्थ्यांना जागा दिल्या नाहीत तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार, असं सांगत भाजप आमदार गोपीचंद पडळकरही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. पडळकरांच्या इशाऱ्यानंतर आता एमपीएससी आयोगानं एक परिपत्रक काढलं आहे. विविध विभागातील पदसंख्या आणि आरक्षितक जागा हा विषय आयोगाच्या अखत्यारित येत नाही. तर हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित येतो, असं एमपीएससी आयोगानं स्पष्ट केलंय. (Explanation of MPSC Commission after the warning of Gopichand Padalkar)

एमपीएससी आयोगाने नेमकं काय म्हटलंय?

विविध विभागातील पदसंख्या आणि आरक्षित जागा हा विषय आयोगाच्या अखत्यारीत येत नाही. राज्य शासनाच्या अखत्यारीत हा विषय येतो. शासनाने दिलेल्या मागणीपत्रानुसार आम्ही भरती करतो. आरक्षित जागांचा विषय आमच्याकडे येत नाही, असं एमपीएससी आयोगाने एका परिपत्रकातून म्हटलंय. तर एमपीएससीच्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, महाराष्ट्र लोकसेवा अभियांत्रिकी सेवा 2020 आणि राज्य सेवा पुर्व परीक्षा 2020 या तिन्ही पुर्व परीक्षांचा निकाल हा पुढच्या आठवड्यात लागणार आहे, अशी माहिती एमपीएससी आयोगानं दिली आहे.

‘बिंदू नामावलीनुसार धनगर समाजाच्या जागा भरा’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रशासनावर वचक नाही. मुख्यमंत्री निकामी आणि प्रशासनही निकामी आहे. सामान्य प्रशासन विभाग आणि समाज कल्याण विभागाचे मंत्री झोपा काढत आहेत का? असा खोचक सवालही गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे. बिंदू नामावलीनुसारचं धनगर समाजाच्या जागा भरा अशी मागणी पडळकर यांनी केली आहे, अन्यथा आंदोलनाचा इशाराही पडळकर यांनी दिलाय.

‘धनगर समाजातील मुलांवर अन्याय’

एमपीएससी आयोग धनगर आणि वंजारी समाजाला आरक्षणानुसार जागा देत नाही. त्यामुळे धनगर समाजातील मुलांवर अन्याय होत असल्याची विद्यार्थ्यांची भावना आहे. 2020च्या एमपीएससी आणि पीएसआय पदांच्या भरतीत धनगर समाजाला अवघ्या तीन जागा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे आयोगाने आरक्षणानुसार जागा भराव्यात, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा विद्यार्थ्यांनी केला आहे. एनटीडी आणि एनटीसी जागा आरक्षणानुसार द्या, अशी मागणीही या विद्यार्थ्यांनी केली आहे.

इतर बातम्या :

‘बिंदू नामावलीनुसार धनगर समाजातील विद्यार्थ्यांना जागा द्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करु’, पडळकरांचा इशारा

तालिबानी वृत्तीने वागाल तर शेतकरी शांत बसणार नाही, बैलगाडा शर्यतीवरुन सदाभाऊ खोतांचा राज्य सरकारला इशारा

Explanation of MPSC Commission after the warning of BJP MLA Gopichand Padalkar

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI