Nagpur Crime | ससेगावात गावठी बॉम्बचा स्फोट, तीन जणांच्या डोळ्यात गेली माती, काय आहे प्रकरण? 

| Updated on: Feb 12, 2022 | 3:57 PM

कुही तालुक्यातील ससेगाव येथील शेतात अज्ञात व्यक्तीने गावठी बॉम्ब पुरून ठेवला होता. या गावठी बॉम्बचा स्फोट झाला. यात दोन महिला मजूर व एक दहा वर्षीय मुलगा जखमी झाला.

Nagpur Crime | ससेगावात गावठी बॉम्बचा स्फोट, तीन जणांच्या डोळ्यात गेली माती, काय आहे प्रकरण? 
कुर्ल्यात शॉपिंग सेंटरचा छज्जा कोसळून पाच वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू
Follow us on

नागपूर : ससेगावच्या (Sasegaon) गोपाळटोळीत राहणारी करिना दिलीप सोनवाने हिने कुली पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार, गोपाळटोळीतील महिला मजूर कैलास ठवकर यांच्या शेतात चना कापण्यासाठी गेल्या होत्या. सध्या दोनशे रुपये दररोजची महिलांना चना कापण्यासाठी मजुरी मिळते. शेतात चना कापणी करीत असताना त्या गोष्टी सांगत होत्या. तेवढ्यात अचानक शेतात असलेल्या गावठी बारूद (Gawthi Barud) गोळ्यावर विळ्याचा (Vila) धक्का लागला. याचा चांगलाच स्फोट झाला. या स्फोटात दोन महिला मजूर जखमी झाल्या. आईच्या मागे गेलेला दहा वर्षांचा मुलगाही जखमी झाला. शेतात सुमन सोनवणे, पंचफुला जाधव, मीना जाधव, मनीषा वाघोडे, राजविकास वाघोडे व विक्रम सोनवणेसह चना कापत होत्या.

बॉम्बला लागला विळ्याचा धक्का

यापैकी पंचफुला जाधव (वय २५) व मनीषा वाघोडे (वय २५) या दोघी शेताच्या डाव्या बाजूला चना कापत होत्या. विक्रम हा चिमुकला त्यांच्याजवळ उभा होता. बाकीच्या महिला या शेताच्या उजव्या बाजूला काही अंतरावर चना कापत होत्या. बुधवारची ही घटना दुपारी साडेबारा वाजताची आहे. विक्रमला काळ्या रंगाचा दगडासारखा गोल गोळा दिसला. तो काय आहे, हे पाहण्यासाठी पंचफुला जाधव व मनीषा वाघोडे हे तिघेच जवळ असल्याने गेल्या. तिघेही तो गोळा कसला आहे, हे पाहात असताना पंचफुला हिचा विळा अचानक गोळ्याला लागला. गोळ्याचा स्फोट होऊन फटाक्यासारखा आवाज झाला. शेतातील माती पंचफुला जाधव व मनीषा वाघोडे व विक्रमच्या डोळ्यात गेली. त्यांना काहीही दिसत नव्हते.

जखमी नागपूरच्या मेडिकलमध्ये दाखल

स्फोटाचा आवाज ऐकून बाजूच्या शेतात काम करणारे कैलास ठवकर धावून आले. त्यांनी तिघांनाही कुही येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रुग्णांना उपचाराकरिता नागपूर मेडिकल येथे भरती करण्यात आले आहे. स्फोट झालेला बारूदचा गोळा अज्ञात व्यक्तीने जंगली डुक्कर मारण्याच्या उद्देशाने शेतात ठेवला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कुही पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोध गुन्हा नोंदवला. पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार विजय कुमरे तपास करत आहेत.

Nagpur Z p | नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची आता गुणवत्ता चाचणी, गुरुजी कसे जाणार सामोरे?

गोंदिया जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींसाठी सहा उमेदवारी अर्ज, नगराध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार?

Video – नागपूर सीमेलगतच्या गावात शिरले अस्वल; रात्रीच्या अंधारात शिकारीचा बेत?, वनविभागाची शोधमोहीम