Tadoba Tiger | कोंडेगावात अवतरले वाघोबा; ग्रामस्थांनीच बदलला मार्ग, जंगलाबाहेर येण्याचे कारण काय?

| Updated on: Feb 05, 2022 | 3:30 PM

वाघांची संख्या तोडोबा कोअर झोनमध्ये वाढत असल्यानं मग नवीन वाघांना आपला प्रदेश शोधावा लागतो. त्यासाठी ते अस्तित्वात असलेल्या वाघांचा प्रदेश सोडून दुसरीकडं मार्ग शोधतात. यामुळं अशा घटना घडतात.

Tadoba Tiger | कोंडेगावात अवतरले वाघोबा; ग्रामस्थांनीच बदलला मार्ग, जंगलाबाहेर येण्याचे कारण काय?
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

चंद्रपूर : चंद्रपूरच्या कोंडेगावात ग्रामस्थांच्या वर्दळीच्या मार्गावर वाघोबा अवतरले. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (Tadoba-Dark Tiger Project) बफर क्षेत्रात कोंडेगाव येते. शेतशिवारात काम करणाऱ्या ग्रामस्थांना पुढ्यात अचानक वाघ आला. समोर ग्रामस्थ दिसत असूनही वाघोबा निश्चल राहिले. अखेर वाघोबा ठाण मांडून असल्याचे पाहून ग्रामस्थांनीच मार्ग बदलला. ताडोबातील वाघोबांची संख्या वाढली. त्यामुळं त्यांचं सतत स्थलांतर (Continuous migration) होत असते. यामुळं असे प्रकार घडतात. वाघाच्या बछडे मोठे झाल्यानंतर ते आपल्या आई-वडिलांना सोडून स्वतःचा प्रदेश शोधून काढतात. वाघांची संख्या तोडोबा कोअर झोनमध्ये (In the core zone) वाढत असल्यानं मग नवीन वाघांना आपला प्रदेश शोधावा लागतो. त्यासाठी ते अस्तित्वात असलेल्या वाघांचा प्रदेश सोडून दुसरीकडं मार्ग शोधतात. यामुळं अशा घटना घडतात.

जंगलाबाहेर वाघ पाहणे रोमांचकारी

कोअर क्षेत्रात वाघांची संख्या वाढल्यानं नवीन वाघांना आपला दुसरा प्रदेश धुंडाळावा लागतो. त्यात वाघ-माणूस हा संघर्ष आहेच. देश-विदेशातील पर्यटक ताडोबा फिरायला येतात. तेव्हा त्यांना सफारी केल्यानंतर तर वाघ दिसतोच. पण, कधी-कधी कोअर झोनच्या बाहेरही वाघांचे दर्शन होते. कोअर क्षेत्राबाहेर वाघ पाहण्याचा आनंद काही औरच असतो. अशा घडना ताडोबा परिसरात घडत असतात. त्यामुळं पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. खुल्या वातावरणातील वाघ पाहणे हा पर्यटकांसाठी रोमांचकारी क्षण असतो.

वाघाच्या हल्ल्यात ग्रामस्थांचा मृत्यू

चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प बफर क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात ग्रामस्थांचा मृत्यू झालाय. ही घटना सीतारामपेठ गावाजवळच्या शिवारात काल घडली आहे. जनावरांसाठी हिरवा चारा आणण्यासाठी काही ग्रामस्थ शिवारात गेले होते. त्यातील नमूद धांडे 50 या इसमावर वाघाने हल्ला केला. या भागात वाघाचे वास्तव्य असल्याचे वनविभागाने ग्रामस्थांच्या आधीच लक्षात आणून दिले होते. तरीही या भागात चारा तोडण्यासाठी ग्रामस्थांनी प्रवेश घेतला. घटनेनंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. प्रकरणाचा अधिक तपास सुरू करण्यात आला आहे. वाघ गावात येत असल्यानं काही गावकरी नेहमी संतप्त होतात. वाघाला जंगलाबाहेर कशाला येऊ देता. त्यांचा तिकडंच का बंदोबस्त करत नाही, असा संतप्त सवाल विचारतात.

Nagpur Crime | पत्नी सोडून जाईल या भीतीने आत्महत्येचा प्रयत्न; नागपुरात नेमकं काय घडलं?

यवतमाळ – वणी पोलिसांवर मोठी कारवाई, चार पोलीस निलंबित; ठाणेदाराला अभय का?, काय आहे प्रकरण?

हिंगणघाटातील अंकिता जळीतकांडाचा निकाल आता नऊ फेब्रुवारीला; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची माहिती