AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यवतमाळ – वणी पोलिसांवर मोठी कारवाई, चार पोलीस निलंबित; ठाणेदाराला अभय का?, काय आहे प्रकरण?

यवतमाळ जिल्ह्यातील वणी पोलीस स्टेशनचे चार कर्मचारी निलंबित करण्यात आलेत. अठरा पोलीस कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले. अवैध सट्टा, सुगंधी तंबाखूवर पोलीस उपमहानिरीक्षकांच्या धाडसत्रानंतर पोलिसांवर कारवाई करण्यात आली.

यवतमाळ - वणी पोलिसांवर मोठी कारवाई, चार पोलीस निलंबित; ठाणेदाराला अभय का?, काय आहे प्रकरण?
वणी पोलीस ठाणे
| Edited By: | Updated on: Feb 05, 2022 | 1:33 PM
Share

यवतमाळ : अमरावतीचे पोलीस उपमहानिरीक्षक (Deputy Inspector General of Police, Amravati) (डीआयजी) चंद्रकिशोर मिना यांनी शनिवारी धाडसत्र राबवलं. डीआयजी पथकाने वणीत सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर धाड टाकली. पथकाने एकाच वेळी शहरात चालणारे चार मटका अड्डा व दोन सुगंधित (प्रतिबंधीत) तंबाखू विक्रेत्यावर धाड टाकली. अमरावतीहून टीम येऊन वणीत कारवाई करीत असल्याने या प्रकरणी वणी पोलीस ठाण्याचे (Wani Police Station) पितळ उघडे पडले. या प्रकरणी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे बोलले जात होते. 23 कर्मचार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. यातील 4 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची (Suspension on 4 employees) कारवाई करण्यात आली. निलंबित करण्यात आलेल्यापैकी एक पोलीस कर्मचारी पाय फ्रॅकचर झाल्यामुळे मागील तीन महिन्यांपासून वैद्यकीय रजेवर होता. तर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात नेमणूक असलेल्या एका कर्मचार्‍यालाही दोषी ठरविण्यात आलंय. पण, ठाणेदाराला अभय का देण्यात आला, अशा प्रश्न विचारला जात आहे.

ठाणेदाराला अभय का?

वणीत हे सर्व अवैध धंदे ठाणेदाराच्या आशीर्वादाने सुरू होते. ठाणेदाराच्या परवानगीशिवाय हे सर्व शक्यच नाही. त्यामुळं आश्चर्य व्यक्त होत आहे. वणी शहरात सुरू असलेल्या प्रतिबंधित तंबाखूच्या विक्री बाबतही पुरावे गोळा केले. शनिवारी 29 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता शहरात सुरू असलेले चार मटका अड्डे व दोन प्रतिबंधित तंबाखूची विक्री करणार्‍या व्यावसायिकांवर धाड टाकली. या कारवाईत सुमारे 13.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच मटका प्रकरणी 43 जणांवर तर तंबाखू विक्री प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. वणीत क्रिकेट सट्टा व मटकाच्या व्यवसायात दर दिवशी लाखो करोडो रुपयांची उलाढाल होत असते.

19 कर्मचाऱ्यांची तीन वर्षांसाठी वेतनवाढ रोखली

या प्रकरणी डीबी पथक इंचार्ज एएसआय सुदर्शन वानोळे, अशोक टेकाडे, पंकज उंबरकर व डीबी पथकाचे इकबाल शेख यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच वणी ठाण्यातील काही पोलिस अधिकार्‍यांसह 19 कर्मचाऱ्यांची तीन वर्षांसाठी वेतनवाढ रोखण्यात आली आहे. शहरात आणि उपविभागात अवैध व्यवसाय फोफावला आहे. याची माहिती अमरावती येथील पोलीस निरीक्षक कार्यालयात पोहोचली. यावरून अमरावतीतील पथकाने वणीत येऊन रेकी केली. अनेक ठिकाणावर स्वत: जाऊन मटका अड्डा सुरू असल्याची खात्री केली.

हिंगणघाटातील अंकिता जळीतकांडाचा निकाल आता नऊ फेब्रुवारीला; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची माहिती

स्वयंरोजगारासाठी वित्त पुरवठ्याच्या महत्त्वाच्या योजना; नागपुरात कुठे आणि कसा संपर्क साधता येईल जाणून घ्या…

Nagpur Traffic | नेहरूनगर झोनमधील गडरलाईनचे काम सुरू; दोन मार्चपर्यंत वाहतूक मार्गात काय झालेत बदल?

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.