AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी! विधान परिषदेच्या 16 जागांसाठी निवडणूक जाहीर, मतदान कधी?

महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या १६ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसाठी अखेर निवडणूक जाहीर झाली आहे. १८ जून २०२६ रोजी मतदान तर २२ जून रोजी मतमोजणी होणार असून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. संपूर्ण वेळापत्रक आणि मतदारसंघांची यादी येथे पहा.

महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी! विधान परिषदेच्या 16 जागांसाठी निवडणूक जाहीर, मतदान कधी?
Maharashtra election
| Updated on: May 18, 2026 | 10:33 AM
Share

महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला असून लवकरच पुन्हा एकदा निवडणुकीची रणधुमाळी उडणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) राज्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या प्रदीर्घ काळापासून रिक्त असलेल्या १६ जागांसाठी अखेर अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या जागांसाठी येत्या १८ जून २०२६ रोजी मतदान होणार असून, २२ जून २०२६ रोजी मतमोजणी पार पडेल.

निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणूक घेण्यासाठी संबंधित मतदारसंघातील किमान ७५% स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत असणे आणि किमान ७५% मतदार (लोकप्रतिनिधी) पदावर असणे अनिवार्य आहे. महाराष्ट्रात या निकषांची पूर्तता न झाल्यामुळे या १६ जागांवर वेळेत निवडणूक घेता आली नव्हती. मात्र, आता या सर्व अटी व निकष पूर्ण झाले असल्याचा अहवाल महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी (CEO) दिल्यानंतर निवडणूक आयोगाने तत्परतेने हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक 

  • अधिकृत अधिसूचना जारी करणे  : २५ मे २०२६ (सोमवार)
  • उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत: ०१ जून २०२६ (सोमवार)
  • उमेदवारी अर्जांची छाननी  : ०२ जून २०२६ (मंगळवार)
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस: ०४ जून २०२६ (गुरुवार)
  • मतदानाचा दिनांक  : १८ जून २०२६ (गुरुवार)
  • मतदानाचा वेळ: सकाळी ०८:०० ते दुपारी ०४:०० पर्यंत
  • मतमोजणी आणि निकाल : २२ जून २०२६ (सोमवार)

 सदस्यांचा कार्यकाळ संपलेल्यांची नावे

  • सोलापूर: प्रशांत प्रभाकर परिचारक
  • अहमदनगर: अरुणकाका बालभीमराव जगताप
  • ठाणे: फाटक रवींद्र सदानंद
  • जळगाव: चंदूभाई व्ही. पटेल
  • सांगली-कम-सातारा: कदम मोहनराव श्रीपती
  • नांदेड: अमरनाथ अनंतराव राजूरकर
  • यवतमाळ: दुष्यंत सतीश चतुर्वेदी
  • पुणे: अनिल शिवाजीराव भोसले
  • भंडारा-कम-गोंदिया: डॉ. परिणय रमेश फुके
  • रायगड-कम-रत्नागिरी-कम-सिंधुदुर्ग: अनिकेत सुनील तटकरे
  • नाशिक: नरेंद्र भिकाजी दराडे
  • वर्धा-कम-चंद्रपूर-कम-गडचिरोली: रामदास भगवानजी आबिटकर
  • अमरावती: प्रवीण रामचंद्र पोते
  • उस्मानाबाद-कम-लातूर-कम-बीड: सुरेश धस
  • परभणी-कम-हिंगोली: विप्लव गोपीकिसन बजोरिया
  • औरंगाबाद-कम-जालना: अंबादास दानवे

आदर्श आचारसंहिता लागू

निवडणूक आयोगाच्या या घोषणेसोबतच संबंधित मतदारसंघांच्या कार्यक्षेत्रात ‘आदर्श निवडणूक आचारसंहिता’ (Model Code of Conduct) तातडीने लागू करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवरील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य यांच्या संख्याबळावर या जागांचे भवितव्य ठरणार असल्याने, आता महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये स्थानिक पातळीवर जोरदार मोर्चेबांधणी आणि राजकीय गणितांना सुरुवात झाली आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...