AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US-Iran Tension : भारतासाठी वाईट बातमी, इराणवर पुढचा हल्ला कुठे होणार, त्या संदर्भात महत्वाची माहिती समोर

US-Iran Tension : इस्रायली मीडिया रिपोर्ट्सनुसार इस्रायली लष्काराला हाय-अलर्टवर ठेवण्यात आलं आहे. ट्रम्प चीन दौऱ्यावरुन परतल्यानंतर अमेरिकेकडून लष्करी कारवाईच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. कुठल्याही क्षणी ही युद्धबंदी मोडून पडेल व पुन्हा युद्धाचा भडका उडेल अशी स्थिती आहे.

US-Iran Tension : भारतासाठी वाईट बातमी, इराणवर पुढचा हल्ला कुठे होणार, त्या संदर्भात महत्वाची माहिती समोर
Donald Trump-Mojtaba Khamenei
| Updated on: May 18, 2026 | 10:26 AM
Share

अमेरिका आणि इराणमध्ये कुठल्याही क्षणी पुन्हा युद्ध सुरु होण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दौऱ्यावरुन परतल्यानंतर अमेरिकेकडून लष्करी कारवाईच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा धमकी दिली आहे. इराणने लवकर निर्णय घेतला नाही, तर त्यांच्याजवळ काही उरणार नाही असं ट्रम्प स्पष्टपणे म्हणाले आहेत. यावर्षी 28 फेब्रुवारीला अमेरिकन आणि इस्रायली एअर फोर्सने इराणवर हल्ला केला होता. इराणचे अनेक कमांडर्स, महत्वाचे लष्करी अधिकारी, रणनितीकार अमेरिका-इस्रायलने संपवले. पण त्यांना त्यांचं लष्करी उद्दिष्ट्य साध्य करता आलेलं नाही. इराण आणि अमेरिकेत सध्या सीजफायर म्हणजे युद्धबंदी लागू आहे. पण कुठल्याही क्षणी ही युद्धबंदी मोडून पडेल व पुन्हा युद्धाचा भडका उडेल अशी स्थिती आहे.

मध्यपूर्वेतील तणावाने टोक गाठलं आहे. सध्या अमेरिकेने इराणवर थेट हल्ला करण्याऐवजी स्ट्रेट ऑफ हॉर्मुजच्या नाकेबंदीचा पर्याय अवलंबला आहे. इराणने त्यांचं संवर्धित युरेनियम आपल्या ताब्यात द्यावं, काहीही करुन इराणला अणवस्त्र संपन्न देश बनू देणार नाही हे अमेरिकेने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे लवकरच युद्धाचा दुसरा टप्पा सुरु होऊ शकतं. दरम्यान एक महत्वाची बातमी आहे. इस्रायली मीडिया रिपोर्ट्सनुसार इस्रायली लष्काराला हाय-अलर्टवर ठेवण्यात आलं आहे. कुठल्याही क्षणी अमेरिकेकडून लष्करी कारवाईची सुरुवात होऊ शकते अशी स्थिती आहे. त्यामुळे इस्रायली मिलिट्री हाय-अलर्टवर आहे.

यावेळी हल्ला कुठे होईल?

अमेरिकेने इराणवर नवीन हल्ले केल्यास इस्रायलच त्यात सहभाग असेल. यावेळी इराणच्या ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केलं जाईल असं कान या पब्लिक ब्रॉडकास्टरने सूत्राच्या हवाल्याने म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यात जवळपास 30 मिनिटे चर्चा झाली.

ही भारत आणि जगासाठी चांगली बातमी नाही

इराणच्या ऊर्जा प्रकल्पांना आतापर्यंत अमेरिका-इस्रायलने जास्त हात लावला नव्हता. कारण त्यात जगाचं नुकसान होतं. आता दोन्ही देशांनी मिळून इराणच्या ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केलं, तर इराणकडून सुद्धा आखाती देशातील तेल, गॅस प्रकल्पांवर हल्ले होऊ शकतात. अशा स्थितीत आधीच खराब स्थिती असलेल्या तेल-गॅसच अजून भीषण संकट तयार होईल. कारण या हल्ल्यांमध्ये ऊर्जा प्रकल्पांच्या इन्फ्रास्ट्रक्चरच नुकसान झालं तर त्या दुरुस्तीसाठी काही वर्ष लागू शकतात. ही भारत आणि जगासाठी चांगली बातमी नाही.

Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय