Nagpur campaign | मनपाने राबविली कचऱ्याच्या जनजागृतीची मोहीम; ओला, सुका नि घातक कचरा कोणता?

| Updated on: Jan 12, 2022 | 3:19 PM

कचऱ्याची योग्य विल्लेवाट व्हावी, यासाठी नागपूर महापालिकेने पुढाकार घेतला. महापालिकेचे कर्मचारी घरोघरी जनजागृती राबवित आहेत. ओला, सुका तसेच घातक कचरा कोणता याबद्दल नागरिकांना मार्गदर्शन करत आहेत.

Nagpur campaign | मनपाने राबविली कचऱ्याच्या जनजागृतीची मोहीम; ओला, सुका नि घातक कचरा कोणता?
नरसाळा येथे कचऱ्याची जनजागृती करून पाम्पेट्स वाटप करताना मनपा कर्मचारी.
Follow us on

नागपूर : नागरिकांनी कचरा विलगीकरण करणे, सुका आणि ओला कचरा (Garbage) वेगवेगळ्या डस्टबिनमध्ये गोळा करावा. तसेच प्लास्टिकचा वापर बंद करण्याबाबत मनपा जनजागृती करत आहे. महापालिकेतर्फे (Municipal Corporation) आयोजित रॅलीत मनपाचे कर्मचारी तसेच स्वयंसेवी सामाजिक संस्थांनी भाग घेतला. रॅली काढण्यात आलेल्या मार्गावरील कचरा उचलण्यात आला. महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि स्वच्छता सर्वेक्षण नियंत्रण समिती प्रमुख भुवनेश्‍वरी एस., अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या नेतृत्वात मनपाच्या दहाही झोनमध्ये रॅली काढण्यात आली. मंगळवारी झोनमध्ये सहायक आयुक्त विजय हुमणे यांच्या नेतृत्वात जनजागृती रॅली मंगळवारी बाजार येथून निघून क्लार्क टाऊन, सखाराम उद्यानपर्यंत काढण्यात आली.

कोणता कचरा कोणत्या प्रकारात मोडतो?

फळांचे छिलके, जेवणातील खराब टिश्यू पेपर, कापलेला भाजीपाला, अंड्याचे छिलटे, हार-फूल, वाचलेले अन्न, फिश बोन्स, खराब फळे, चायची पत्ती, पडलेली पाने, गवत यांचा समावेश ओल्या कचऱ्यात होतो. खरडे, प्लास्टिक थैली, बॉटल, दूध-दह्याचे पॉकेट्स, पेपर-न्यूजपेपर, नारळाचे डोल, कार्डबोर्डचे खराब रद्दी पेपर, काचेची बॉटल, पेपरचे कप, प्लेट यांचा समावेश सुक्या कचऱ्यात होतो. तर, मुलांचे सॅनिटरी नॅपकीन, मुलांचे डायपर, खिळे, वापलेली सुई, औषधी, कंडोम, इंजेक्शनची सुई, पट्ट्या हे सारे घातक कचऱ्याच्या प्रकारात मोडतात.

लक्ष्मीनगर, धंतोली परिसरात जनजागृती

लक्ष्मीनगर झोनमध्ये सहायक आयुक्त गणेश राठोड यांच्या नेतृत्व धंतोली उद्यानातून जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये झोनल अधिकारी रामभाऊ तिडके, झोनमधील कर्मचारी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. रॅलीच्या माध्यमातून धंतोली परिसरात जनजागृती करण्यात आली. तसेच रस्त्यावरील प्लास्टिक कचरा उचलण्यात आला. धरमपेठ झोनमध्ये सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांच्या नेतृत्वात कॉफी हाऊस चौक येथून जनजागृती रॅली काढण्यात आली. पुढे ही रॅली शिवाजीनगर, रामनगर, रवीनगर रोड आणि गोकुळपेठ मार्केट मार्गापर्यंत काढण्यात आली. रॅलीत झोनल अधिकारी दीनदयाल टेंभेकर, झोनचे सर्व स्वच्छता निरीक्षक आणि ग्रीन व्हिजिल संस्थेचे प्रमुख कौस्तुभ चॅटर्जी, सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, र्शिया जोगे यांच्यासह संस्थेचे २0 सदस्य आणि उपस्थित होते.

नरसाळा रोडवर झाली रॅलीची सांगता

हनुमाननगर झोनमध्ये सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांच्या नेतृत्वात बेसा पॉवर हाऊस येथून जनजागृती रॅली विविध मार्गक्रमण करीत नरसाळा रोडवर रॅलीची सांगता झाली. रॅलीत झोनल अधिकारी दिनेश कालोडे आणि झोनचे कर्मचारी उपस्थित होते. धंतोली झोनमध्ये नगरसेविका लता काडगाये आणि सहायक आयुक्त किरण बगडे यांच्या नेतृत्वात जनजागृती रॅली निघाली. रॅलीत झोनल अधिकारी धमेंद्र पाटील आणि झोनचे कर्मचारी उपस्थित होते. नेहरूनगर झोनमध्ये झोनल अधिकारी विठोबा रामटेके यांच्या नेतृत्वात सक्करदरा तलाव येथून रॅली विविध ठिकाणाहून बसेश्‍वर पुतळ्याजवळ संपली.

Nagpur Medical | अखेर भेट झाली! महिनाभरापासून सुरू होते उपचार; घरच्यांना पाहिल्यावर झाले स्मरण

Tarri Pohe | नागपुरातील तर्री पोह्याची चव हरपली; रूपम साखरे यांचे निधन

Nagpur Corona | लग्नसमारंभात पन्नास जणांनाच परवानगी; पण, लक्षात कोण घेतोय?, नागपूर मनपा प्रशासन उगारतोय बडगा