Nagpur Ghatrona | वेकोलिच्या स्फोटांमुळं घरांना तडे!, घाटरोना गावाचे पुनर्वसन होणार काय?

| Updated on: Jan 19, 2022 | 6:26 AM

स्फोटांमुळे घरांना तडे जातात. विहिरींचे पाणी पिण्यायोग्य नाही. मात्र परिसरातून दोहन करून झाले. आता काम संपले. त्यामुळं वेस्टर्न कोल्ड फिल्ड लिमिटेड खाणी शेजारच्या घाटरोना गावाचे पुनर्वसन करायला तयार नाही.

Nagpur Ghatrona | वेकोलिच्या स्फोटांमुळं घरांना तडे!, घाटरोना गावाचे पुनर्वसन होणार काय?
परिसराचे निरीक्षण करताना सुनील केदार.
Follow us on

नागपूर : वेस्टर्न कोल्ड फिल्ड लिमिटेडने (Western Cold Field Ltd.) खाणींसाठी शेती ताब्यात घेतली. आजूबाजूचा परिसर आपल्या ताब्यात घेतला. खाणीतून उत्खनन (Excavation from mines) करण्यासाठी स्फोट करावे लागतात. या स्फोटांमुळे घरांना तडे जातात. विहिरींचे पाणी पिण्यायोग्य नाही. मात्र परिसरातून दोहन करून झाले. आता काम संपले. त्यामुळं वेस्टर्न कोल्ड फिल्ड लिमिटेड खाणी शेजारच्या घाटरोना गावाचे पुनर्वसन करायला तयार नाही. गावकरी आग्रही असताना हा प्रश्न दिर्घकाळ प्रलंबित ठेवला. वरिष्ठ अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, संबंधित गावचे सरपंच यांनी संयुक्त पाहणी करावी. अहवाल सादर करावा, असे निर्देश पशुसंवर्धन दुग्ध विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिले. त्यामुळं घाटरोना गावाचे पुनर्वसन आता तरी होणार का, असे गावकरी विचारत आहेत.

प्रकल्प पीडितांना नोकऱ्या द्याव्यात

वेस्टर्न कोल्ड फिल्ड लिमिटेड मुख्य कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे, माजी आमदार एस. क्यू. जामा तसेच वेस्टर्न कोल्ड फिल्ड लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये घाटरोना गावाचा पुनर्वसनावर चर्चा करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, नागरीक उपस्थित होते. याशिवाय ग्रामपंचायत कांद्री येथील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पुनर्वसन तसेच वेस्टर्न कोल्ड फिल्ड लिमिटेड यांनी सामाजिक दायित्व म्हणून केलेल्या कामातील प्रलंबित प्रकल्प, प्रकल्प पीडितांना नोकऱ्या, प्रलंबित मोबदला आदी विविध विषयांवर चर्चा झाली. नागरिकांच्या समस्या कालमर्यादेत दूर करण्याबाबतची सूचनाही मंत्र्यांनी केली.

रेल्वेने शेतकऱ्यांची अडवणूक करू नये

नागपूर-इटारसी तिसऱ्या लाईनसाठी भूसंपादन करताना कळमेश्वर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी रस्तेच राहिले नाहीत. रेल्वेने तूर्तास कोणतेही काम करताना शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही यासाठी त्यांना प्रथम रस्ते उपलब्ध करावेत. त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी मार्ग करून द्यावा. त्यानंतर आपल्या कामाला गती द्यावी, असे आदेश सुनील केदार यांनी दिले. छत्रपती सभागृहात झालेल्या बैठकीत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी या सूचना दिल्यात. बैठकीत कोहळी-मोहळी, खापरी कोठे, ऐलकापार रिठी, कोहळी, चाकडोह या ठिकाणच्या शेतकऱ्याच्या वहिवाठीचा रस्ता बंद झाल्याबाबत, कळमेश्वर ब्राम्हणी, घोराड क्रॉसिंग गेट बंद करण्याच्या समस्येबाबत चर्चा करण्यात आली. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत गावांच्या सरपंचासोबत मौका पाहणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पंधरा दिवसात यासंदर्भात रेल्वेकडून कारवाई झाल्याचा अहवाल मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. कळमेश्वर ब्राम्हणी मोठा पूल जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत गेट बंद होणार नाही असेही त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना सांगितले.

Smart City | नागपूर स्मार्ट सिटीच्या शिरपेचात मानाचा तुरा!, स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंजसाठी पुरस्कार

Action | नागपुरात कोविड नियमांचे उल्लंघन, तीन लॉनवर कारवाई; मास्कशिवाय फिरणारेही रडारवर

Nagpur Police | चंद्रशेखर बावनकुळे पोलिसांच्या ताब्यात; नाना पटोलेंविरोधात गुन्हा दाखल व्हावा, यासाठी करत होते आंदोलन