Action | नागपुरात कोविड नियमांचे उल्लंघन, तीन लॉनवर कारवाई; मास्कशिवाय फिरणारेही रडारवर

Action | नागपुरात कोविड नियमांचे उल्लंघन, तीन लॉनवर कारवाई; मास्कशिवाय फिरणारेही रडारवर
प्रतिबंध असूनही लग्न समारंभातील संख्या काही कमी होताना दिसत नाही.

नागपुरात कोरोना बाधित रुग्ण गेल्या चोवीस तासांत अडीच हजारांच्या उंबरठ्यावर आले आहेत. तरीही मास्कशिवाय फिरणारे महाभाग आहेत. त्यांना पोलिसांनी रडारवर ठेवले आहे. शिवाय लग्नसमारंभात पन्नास लोकांच्या उपस्थितीच्या नियमांचे उल्लंघन होते, त्यांच्यावरही कारवाई केली जात आहे.

सुनील ढगे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 18, 2022 | 3:32 PM

नागपूर : नागपूर महापालिकेतर्फे सोमवारी नऊ प्रतिष्ठानांविरुद्ध कारवाई करून एक लाख पंधरा हजारांचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने आशीनगर झोन अंतर्गत श्री पंजाब लॉन, ऑटोमोटीव्ह चौक आणि पाटनकर चौक येथील आदत लॉन यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई केली. ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच मंगळवारी झोन अंतर्गत निर्मला सेलिब्रेशन लॉन, गोरेवाडा रिंग रोड येथे कारवाई करुन २५ हजार रुपयाचा दंड वसूल केला. प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या दुकान, प्रतिष्ठानांविरोधात मनपाने कारवाई अधिक कठोर केली आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे बंदी आणल्यानंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत आहे. हे निदर्शनास येताच मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकाने कारवाईला गती दिली आहे. बाजारपेठ, दुकान, भाजी बाजारात प्लास्टिक पिशवीमध्ये सामान देणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात येईल व दंडही वसूल करण्यात येणार आहे. सोमवारी गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. पथकाने गांधीबाग येथील श्रीकांत साडी सेंटर होलसेल मार्केटवर प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल कारवाई करून पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला.

अडकलेला मांजा काढण्यासाठी सहकार्याची गरज

शहरात मकरसक्रांतीच्या सणानिमित्त मोठ्या प्रमाणात पंतग उडविण्यात येतात. यादरम्यान शहरातील झाडे, इमारती, विद्युत खांब, विद्युत तारेवर मांजा अडकलेला असतो. हा मांजा पक्ष्यांसाठी तसेच व्यक्तींसाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे अशा पद्धतीने अडकलेला मांजा काढण्यासाठी शहरातील नागरिक तसेच स्वयंसेवी संस्थांनी मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाद्वारे करण्यात आले आहे. पंतग उडविण्याकरिता नॉयलॉन मांजा तसेच साधा धाग्याचा उपयोग केला जातो. नायलॉन मांजा अत्यंत धोकादायक आहे. यामुळे पशुपक्षी तसेच मानवी जीवीतास हानी होते. सदर कार्यासाठी शहरातील स्वयंसेवी संस्था तथा नागरिकांनी सहभागी होऊन मनपाला सहकार्य करावे. शहरात कुठेही नॉयलॉन मांजा आढळून आल्यास मनपाच्या संबंधीत झोन कार्यालयास व 18002333763 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा.

मास्कशिवाय फिरणाऱ्यांवर कारवाई

नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी सोमवारी मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार ४८ नागरिकांविरुध्द कारवाई केली. त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे २४ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ४३ हजार ५२४ नागरिकांविरुध्द कारवाई करून आतापर्यंत २ कोटी १ लाख २१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोना विषाणूचा संसर्गाचा धोका अद्यापही टळला नाही. आताही अनेक ठिकाणी नागरिक सुरक्षित अंतर पाळत नसल्याचे दिसून येते. नागरी भागात तर विनामास्क नागरिक बाजारपेठेत फिरताना दिसतात ही बाब घातक आहे. त्यामुळे उपद्रव शोध पथकाव्दारे अशाप्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणा-या नागरिकांवर कडक कारवाई करीत आहे.

Fact Check: मोदी नावाचा गावगुंड खरंच आहे का?, नाना पटोलेंच्या गावात ‘टीव्ही9’ची शोध मोहीम; काय आहे सत्य?

Video : अमरावतीहून पोरं निघालेत, शाहिस्तेखानाची फक्त बोटं छाटलेली; नाना पटोलेंनी आपला पंजा सांभाळावा, अनिल बोंडेंचा इशारा

राजीनामा द्या अन् येरवड्यात दाखल व्हा; पुण्याच्या महापौरांची नाना पटोलेंवर खोचक टीका

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें