Video : अमरावतीहून पोरं निघालेत, शाहिस्तेखानाची फक्त बोटं छाटलेली; नाना पटोलेंनी आपला पंजा सांभाळावा, अनिल बोंडेंचा इशारा

नानांनी लक्षात ठेवावं शाहिस्तेखानाची नुसती बोटच छाटली होती तुझा पंजाच छाटलाच जाईल.", असा इशारा अनिल बोंडे यांनी दिला आहे. उगीचच गमच्या मारू नको अमरावती वरून पोर निघाले आहेत पंजा सांभाळून ठेव, असा इशारा बोंडे यांनी दिला आहे.

Video : अमरावतीहून पोरं निघालेत, शाहिस्तेखानाची फक्त बोटं छाटलेली; नाना पटोलेंनी आपला पंजा सांभाळावा, अनिल बोंडेंचा इशारा
नाना पटोलेंबद्दलची टीका अनिल बोंडे यांना भोवणार?
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 1:42 PM

अमरावती : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलेल्या वक्तव्यामुळं भाजप आक्रमक झाली आहे. नाना पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची यांच्या बद्दल वापरलेली भाषा आक्षेपार्ह असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून भाजप नेते आक्रमक झाले आहेत. माजी कृषी मंत्री आणि भाजप नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी नाना पटोले यांच्यावर टीका करताना वादग्रस्त शब्द वापरले आहेत. काँग्रेस नेत्यांमध्ये कुत्र्यांसारखी भुंकायची स्पर्धा लागली आहे. सोनिया गांधी यांना खुष करण्यासाठी मोदींवर किती भुंकायचे याची शर्यत लागली आहे. “नाना पटोले याने तर हद्दच केली मी मालकीणीचा सगळ्यात प्रामानिक कुत्रा आहे. म्हणून दाखविण्यासाठी भुंकण्यासोबतच चावण्याचाही धमकी दिली. पण, नानांनी लक्षात ठेवावं शाहिस्तेखानाची नुसती बोटच छाटली होती तुझा पंजाच छाटलाच जाईल.”, असा इशारा अनिल बोंडे यांनी दिला आहे. उगीचच गमच्या मारू नको अमरावती वरून पोर निघाले आहेत पंजा सांभाळून ठेव, असा इशारा बोंडे यांनी दिला आहे.

तुमचा पंजा छाटला जाईल, अनिल बोंडेंचा इशारा

काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कुत्र्यासारखं भुंकायची स्पर्धा लागली आहे. नाना पटोलेंना मी सांगून ठेवतो, तुम्ही म्हणता मोदींना मारु शकतो. तर, तुमचा पंजा छाटला जाईल. नाना पटोलेंनी गमजा करु नये. काँग्रेस नेत्यांना मोदींजींच्या नखाची सर तरी येते का? पालकमंत्री छप्पन इंच छाती म्हणतात. विधानसभेत नखला करतात.

पोलीस, गृहमंत्री कुठं गेले?

काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष नरेंद्र मोदींना मारू शकतो असं म्हणत असेल तर त्या कुत्र्याला दांडक मारायला काय हरकत आहे. नारायण राणेंना अटक करतात. नितेश राणेंवर कारवाई करतात. नाना पटोले बोलल्यावर कुठं गेली पोलीस, कुठं गेले गृहमंत्री असा सवाल अनिल बोंडे यांनी केलं.

अमरावतीमधून पोरं निघाली आहेत

नाना पटोले यांचं सोनिया गांधी यांना खुष करण्यासाठी वक्तव्य आहे. काँग्रेसला दुखावू नये म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादी साथ देतीय.नाना पटोले पंतप्रधान नरेंद्र मोदीला मारतो म्हणत असेल तर त्याला अटक टाकला पाहिजे, असं अनिल बोंडे म्हणाले. पोलिसांनी कारवाई करावी, अन्यथा अमरावतीतून पोर निघाली आहेत. त्यांनी जपून राहावं, असा इशारा अनिल बोंडे यांनी दिला. देशाच्या पंतप्रधानांबद्दल दुसऱ्या पक्षाच्या कोणत्या प्रदेशाध्यक्षानं म्हटलंय का? नाना पटोले जर म्हणत असेल तर त्याला फटका मारला पाहिजे ना, असं वक्तव्य अनिल बोंडे यांनी केलं.

नाना पटोले नेमकं काय म्हणाले होते?

“मी का भांडतो? मी आता मागील 30 वर्षापासून राजकारणात आहे. लोकं पाच वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करुन टाकतात. शाळा, कॉलेज हे करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली. एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला. एक प्रमाणिक नेतृत्व तुमच्या इथे आहे….”असं आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला आणि ऐकायला मिळत आहे.

इतर बातम्या:

Mumbai | Nana Patole यांच्या मुंबईतल्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवली

Fact Check: मोदी नावाचा गावगुंड खरंच आहे का?, नाना पटोलेंच्या गावात ‘टीव्ही9’ची शोध मोहीम; काय आहे सत्य?

BJP Leader Anil Bonde slam Nana Paotle over alleged statement about Narendra Modi bone also use controversial statement

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.