Smart City | नागपूर स्मार्ट सिटीच्या शिरपेचात मानाचा तुरा!, स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंजसाठी पुरस्कार

Smart City | नागपूर स्मार्ट सिटीच्या शिरपेचात मानाचा तुरा!, स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंजसाठी पुरस्कार
नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भूवनेश्वरी एस.

या चॅलेंजसाठी सुमित आशिया आर्किटेक्ट, ब्लॅक स्लेट मुंबई, मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्ट आणि अर्बन प्लांनेर हर्षल बोपर्डीकर यांचे सहकार्य मिळाले. तसेच स्मार्ट सिटीच्या सर्व अधिकाऱ्यांनी स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंजसाठी मदत केली.

सुनील ढगे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 18, 2022 | 4:40 PM

नागपूर : केंद्र शासनाच्या गृह निर्माण आणि शहरी विकास मंत्रालयातर्फे स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंजच्या पुरस्काराची घोषणा सोमवारी करण्यात आली. यामध्ये नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडला स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंज अंतर्गत पुरस्कार घोषित झाला आहे. यात देशातील नागपूरसह 11 प्रमुख शहरांचा समावेश आहे. या चॅलेंज अंतर्गत नागपूर स्मार्ट सिटीला 50 लाख रुपयाचा पुरस्कारसुद्धा घोषित करण्यात आला आहे.

देशातील पहिल्या अकरा शहरांमध्ये समावेश

स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भूवनेश्वरी एस. यांनी सांगितले, केंद्र शासनातर्फे स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंज उपक्रम 100 स्मार्ट सिटीसाठी राबबविण्यात आला होता. यामधून सुरुवातीला 38 शहरांची निवड करण्यात आली होती. आता नागपूर स्मार्ट सिटीचा समावेश पहिल्या 11 शहरांमध्ये करण्यात आला आहे. नागपूरसाठी हा पुरस्कार अभिमानाची बाब आहे. याअंतर्गत नागपूरला 50 लाख रुपयाचा पुरस्कार सुद्धा घोषित करण्यात आला आहे. यासाठी त्यांनी सर्व नागपूरकरांचा, महापौर दयाशंकर तिवारी, स्मार्ट सिटीचे चेयरमन आणि मेंटॉर डॉ. संजय मुखर्जी, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, स्टेक होल्डर्स यांचे आभार मानले. पुढे त्या म्हणाल्या, स्टेक होल्डर्स सोबत बैठक घेऊन स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंजची संकल्पना करण्यात आली. नागपूर स्मार्ट सिटीतर्फे सीताबर्डी आणि सक्करदरा भागाची निवड करण्यात आली होती. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून या बाजारपेठेला शिस्त लावण्याचा तसेच ग्राहकांसाठी सुरक्षित वातावरण राखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. स्मार्ट सिटीतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी मत व्यक्त केले की येथे त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण मार्केटमध्ये तयार करणे गरजेचे आहे. यापूर्वी सुद्धा नागपूर स्मार्ट सिटीची इंडिया सायकल फॉर चेंज चॅलेंज अंतर्गत निवड करण्यात आली होती. याअंतर्गत नागपूर स्मार्ट सिटीला नागपूरला एक कोटी रुपयाचा पुरस्कार मिळाला होता.

गर्दीच्या ठिकाणी जाण्यासाठी ज्येष्ठांना भीती

स्मार्ट सिटीच्या पर्यावरण विभागाच्या प्रभारी व्यवस्थापक व नोडल अधिकारी डॉ. प्रणिता उमरेडकर यांनी सांगितले की, नागपूर स्मार्ट सिटीतर्फे नागपूर महापालिकेच्या सहकार्याने शहरात स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंजसाठी सीताबर्डी बाजारपेठ आणि सक्करदरा भागाची निवड करण्यात आली होती. नागपूर स्मार्ट सिटीच्या वतीने या भागांचा सर्वेक्षण करण्यात आला. मार्केट भागात वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे या वाहनांवर प्रतिबंध लावण्याची आवश्यकता स्थानिक नागरिकांनी बोलून दाखविली होती. तसेच सीताबर्डी बाजारपेठेत युवावर्ग जास्त प्रमाणात येतो. त्यानंतर प्रौढ वर्ग येतो. मात्र या मार्केटमध्ये सुरक्षितता वाटत नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक येथे येण्यासाठी विचार करतात, असे सर्वेक्षणातून समोर आले.

Fact Check: मोदी नावाचा गावगुंड खरंच आहे का?, नाना पटोलेंच्या गावात ‘टीव्ही9’ची शोध मोहीम; काय आहे सत्य?

Video : अमरावतीहून पोरं निघालेत, शाहिस्तेखानाची फक्त बोटं छाटलेली; नाना पटोलेंनी आपला पंजा सांभाळावा, अनिल बोंडेंचा इशारा

राजीनामा द्या अन् येरवड्यात दाखल व्हा; पुण्याच्या महापौरांची नाना पटोलेंवर खोचक टीका

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें