AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘नमन तुला’: महाराष्ट्र दिनानिमित्त अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे रिलीज

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे ‘नमन तुला’ हे रिलिज झाले आहे. हे गौरव गीत आणि अभिमान गीतात राजा शिवाजी चित्रपटातून चर्चेत असलेले अभिनेते रितेश देशमुख देखील दिसणार आहेत.

‘नमन तुला’: महाराष्ट्र दिनानिमित्त अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे रिलीज
Amruta Fadnavis and Riteish Deshmukh’
| Updated on: Apr 30, 2026 | 11:23 PM
Share

यंदाच्या १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त अमृता फडणवीस यांचे नवे गाणे ‘नमन तुला’ प्रेक्षकांच्या भेटीला आहे. हे महाराष्ट्र गौरव गीत आणि अभिमान गीत आहे. अमृता फडणवीस यांनी या आधीही अनेक प्रसंगानिमित्त विविध गाणी गायली आहेत. त्यांच्या या नव्या गीतात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले आहे. विशेष १ मे रोजी रिलीज होणाऱ्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटातून शिवरायांची भूमिका साकारणारे अभिनेता रितेश देशमुख देखील या गीताच्या व्हिडीओत दिसणार आहेत.

भूषणकुमार आणि टी-सिरिजची ही प्रस्तुती असून, छत्रपती शिवाजी महाराजांना हे अभिवादन आहे. प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाच्या हृदयाला स्पर्श करणारे हे गीत असून, पारंपारिक महाराष्ट्रीय वेषात ते चित्रीत करण्यात आले आहे. शक्ती हसीजा यांनी हे गीत दिग्दर्शित केले आहे. नचिकेत बर्वे यांनी वेशभूषा डिझाईन केली आहे. पवन बॉब यांनी कोरिओग्राफी केली असून, अभिनेता रितेश देशमुख सुद्धा यात सहभागी आहेत.

टी सिरीजच्या युट्युबवर उपलब्ध

प्रसिद्ध संगीतकार अनु मलिक यांनी या गीताला संगीत दिले असून, पारंपारिक पोवाडे, आधुनिक ध्वनी यांचा सुरेख मेळ त्यात आहे. यात महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांचा अभिमान जागृत केला आहे. ‘महाराष्ट्र दिन’  हा केवळ दिनदर्शिकेतील एक दिवस नसून, आपल्या सर्वांच्या मनात जीवंत असलेली ती भावना आहे. माझ्या महाराष्ट्रीयन असण्याचा आणि आपल्या भूमीबद्दल अभिमान व्यक्त करण्याच्या प्रयत्न यातून या गीताची निर्मिती करण्यात आल्याची भावना अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. अभिनेता रितेश देशमुख यांनीही या गीताबद्दल आनंद व्यक्त करताना या प्रकल्पाचा भाग झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. टी सिरीजच्या युट्युबवर हे गीत उपलब्ध आहे.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा