निवडणुकीसाठी युती करण्याआधी शिंदे यांच्या दोन आमदारांच्या दोन तऱ्हा, युती कोणासोबत करणार?
शिवसेना-भाजपने युती म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. फक्त जागावाटपावरुन तीव्र मतभेद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपची आमदार संख्या जास्त असल्याने बहुतांश ठिकाणी ते मोठ्या भावाच्या भूमिकेत दिसू शकतात.

ज्ञानेश्वर लोंढे
नांदेडमध्ये भाजपा-शिवसेनेची महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सकारात्मक चर्चा झाली आहे. शिवसेनेचा शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी माहिती दिली. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप चिखलीकर व शिवसेने शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील यांची गळाभेट. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या कार्यालयात हेमंत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. आमदार चिखलीकर व आमदार पाटील यांच्या महानगरपालिका निवडणुकीचे अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती. शिवसेना-भाजप युतीला पाटील व चिखलीकरांच्या भेटीने खोडा बसण्याची शक्यता आहे. आमदार बालाजी कल्याणकर यांच्याकडून भाजप युती संदर्भात घोषणा तर हेमंत पाटील यांची राष्ट्रवादीचे आमदार चिखलीकरांसोबत चर्चा.
नांदेडमध्ये शिवसेना आमदारांच्या उघड झाल्या दोन भूमिका. नांदेड महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेत पहिल्या बैठकीत सकारात्मक चर्चा. शिवसेना शिंदे गटाने भाजपा समोर ठेवला 60-40 चा प्रस्ताव. शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांची माहिती. आम्ही युतीसाठी सकारात्मक आहोत चर्चेतून तोडगा काढू असं ते म्हणाले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण यांचा नांदेड बालेकिल्ला मानला जातो. शिवसेना-भाजपने युती म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. फक्त जागावाटपावरुन तीव्र मतभेद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपची आमदार संख्या जास्त असल्याने बहुतांश ठिकाणी ते मोठ्या भावाच्या भूमिकेत दिसू शकतात.
दादाच्या राष्ट्रवादीचा प्रस्ताव आला नाही
तर भाजपकडून अशोकराव चव्हाण काँग्रेसमध्ये असताना संख्याबळ जास्त असल्याचा दाखला देत अधिक जागांची मागणी. नांदेड महानगरपालिका क्षेत्रातील मतदारसंघात दोन्ही आमदार शिवसेनेचे असल्याने अधिकच्या जागा मिळवण्यासाठी शिवसेना आग्रही. आम्हाला 7 ते 8 जागा देणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. पुढील बैठकीत सकारात्मक चर्चा होईल आमदार बालाजी कल्याणकर यांची माहिती. भाजपासोबत चर्चा सुरू आहे. मात्र दादाच्या राष्ट्रवादीचा प्रस्ताव आला नाही, आमदार बालाजी कल्याणकर यांची माहिती. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील यांनी घेतली दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची भेट.
