AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded | नांदेडचे प्रसिद्ध कलावंत डॉ. भरत जेठवाणी आता बनले सान्वी जेठवाणी, अत्याधुनिक शस्त्रक्रियेद्वारे लिंग परिवर्तन!

माणसाची ओळख ही चारित्र्याने व आत्म्याने होत असते. त्यामुळे लिंग स्त्री असो किंवा पुरुष असो माणसाची ओळख माणुसकीने झाली पाहिजेअसं वक्तव्य पत्रकाराशी बोलत असताना जेठवाणी यांनी केले

Nanded | नांदेडचे प्रसिद्ध कलावंत डॉ. भरत जेठवाणी आता बनले सान्वी जेठवाणी, अत्याधुनिक शस्त्रक्रियेद्वारे लिंग परिवर्तन!
Image Credit source: TV9 Marathi
Reporter Rajiv Giri
Reporter Rajiv Giri | Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Apr 25, 2022 | 5:09 PM
Share

नांदेडः नांदेडमधल्या नृत्य कलाकार भरत जेठवाणी (Bharat Jethwani) यांनी लिंग परिवर्तन करत स्त्रीरूप धारण केलंय. वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया करत भरतने आता सानवी जेठवाणी (Sanvi Jethwani) असं स्त्री रुप आणि स्रीचं नाव धारण केलय. लहानपणापासून आपण स्त्री असल्याचे वाटत असल्याने आपण स्त्री रूप धारण केल्याचे जेठवाणी यांनी सांगितलं. नांदेडमध्ये लिंग परिवर्तन (Gender transformation) करणारा भरत हा पहिला युवक आहे. अप्रतिम नृत्य कला आणि सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सानवीने या पुढेही आपले कार्य असेच सुरु ठेवणार असल्याचे सांगितले आहे. एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली.

लिंग परिवर्तन करणारे नांदेडमधील पहिले युवक

लहानपणापासून आपण स्त्री असल्याचे समज असणाऱ्या व्यक्तींना वैद्यकीय भाषेत  Gender syphoria असे म्हणातात. अश्या व्यक्तींसाठी मेडिकल सायन्समध्ये लिंग परिवर्तनाचे ऑपरेशन उपलब्ध असून त्याला sex reassignment surgery (srs) असे म्हणतात. ही सुविधा भारतात उपलब्ध असल्याचे समजल्यावर डॉ जेठवानी यांनी हा धाडसी निर्णय घेत पुरुष होऊन आता स्त्रीरूप मध्ये प्रवेश केला आहे. या ऑपरेशन साठी विविध चाचण्या कराव्या लागतात.  मानव रोग तज्ञां पासून ते प्लास्टिक सर्जरी करेपर्यंत याची एक मोठी प्रक्रिया आहे. हक्काचे संरक्षण 2019 या कायदे अनुसार विविध हक्क अशा व्यक्तींना मिळत आहे. जेठवाणी यांनी सदरील ऑपरेशन दिल्ली येथील ऑलमॅक या खाजगी रुग्णालयात येथे करून घेतले. हा प्र वास  किती कठोर होता हे त्यांच्या बोलण्यावरून जाणवत होतं.

माणुसकी हीच खरी माणसाची ओळख

माणसाची ओळख ही चारित्र्याने व आत्म्याने होत असते. त्यामुळे लिंग स्त्री असो किंवा पुरुष असो माणसाची ओळख माणुसकीने झाली पाहिजेअसं वक्तव्य पत्रकाराशी बोलत असताना जेठवाणी यांनी केले. लहानपणापासून मनात असलेल्या एका स्त्रीला आता समाजातदेखील स्थान  मिळेल.  समाजाने  व मित्रमंडळींनी  सर्वांनी मला प्रोत्साहन देऊन इथपर्यंत आणलं आहे व पुढेही सहकार्य करून साथ देऊन पुढील वाटचालीस मला मदत करतील अशी आशा सर्वांकडून बाळगते,असेही त्या म्हणाल्या. जेठवाणी यांनी उच्च शिक्षण प्राप्त केले असून नांदेडला सांस्कृतिक क्षेत्रात नावलौकिक मिळवून दिले आहे . हे कार्य सतत आयुष्यभर सुरू राहणार अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

इतर

टीम इंडियाचा माजी खेळाडू दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार, होणारी पत्नी 28 वर्षांनी लहान

IPL 2022: टीम हरत असली, तरी Mumbai Indians ला चिअर करण्यासाठी अंबानी कुटुंब स्टेडियममध्ये, पहा खास PHOTOS

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?