Nanded : नांदेडमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, ग्रामीण भागात बत्ती गुल

| Updated on: May 13, 2022 | 7:11 AM

असामी चक्रीवादळामुळे हवामान खात्याने नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली होती. हवामान खात्याने व्यक्त केलेली शक्यता खरी आहे. नायगांव, बिलोली, मुखेड आणि देगलूर तालुक्याच्या काही भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.

Nanded : नांदेडमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, ग्रामीण भागात बत्ती गुल
पावसाची खबरबात
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नांदेड – नांदेडमध्ये (Nanded) एकीकडे कमाल तापमान (Temprature) 43. 4 अंशावर गेलंय तर दुसरीकडे जिल्ह्याच्या काही भागात काल सायंकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. असामी चक्रीवादळामुळे हवामान खात्याने (weather department) नांदेडला दिलेला पावसाचा इशारा खरा ठरला आहे. काल सांयकाळी नायगांव, बिलोली, मुखेड आणि देगलूर तालुक्याच्या काही भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे या भागातील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान, रात्री उशिरा देखील अनेक भागात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा विस्कळीत झाला आहे. तर उन्हाळी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसलाय.

पावसाची जोरदार हजेरी

असामी चक्रीवादळामुळे हवामान खात्याने नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली होती. हवामान खात्याने व्यक्त केलेली शक्यता खरी आहे. नायगांव, बिलोली, मुखेड आणि देगलूर तालुक्याच्या काही भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पाऊस सुरू असताना जोराचा वारा सुध्दा होता. त्याचबरोबर विजांचा कडकडाट झाला आहे. काल झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे.

हे सुद्धा वाचा

ग्रामीण भागात बत्ती गुल

पावसामुळे नायगांव, बिलोली, मुखेड आणि देगलूर तालुक्याच्या काही भागात लाईट गायब झाली आहे. मार्च महिन्यापासून नांदेडमध्ये तापमान अधिक आहे. तापमान अधिक असल्याने लोक दुपारी रस्त्यावर फिरताना दिसत सुध्दा नाहीत. विशेष म्हणजे काल झालेल्या पावसामुळे तिथल्या नागरिकांना उकाड्यापासून थोडाफार दिलासा मिळाला आहे.