Nanded sikh halla bol Violence : SP साहेबांवरचा तलवारीचा वार स्वत: झेलला, प्रमोद शेवाळेंचा अंगरक्षक ICU मध्ये

| Updated on: Mar 30, 2021 | 10:56 AM

एसपी प्रमोद शेवाळे (Nanded SP Pramod Shewale) यांच्यावर झालेला हल्ला त्यांचा अंगरक्षक दिनेश पांडे (Dinesh Pandey) यांनी आपल्या अंगावर घेतला.

Nanded sikh halla bol Violence : SP साहेबांवरचा तलवारीचा वार स्वत: झेलला, प्रमोद शेवाळेंचा अंगरक्षक ICU मध्ये
Nanded Sikh Halla bol Violence
Follow us on

नांदेड : होळीच्या मिरवणुकीवरुन नांदेडमध्ये जमावाने थेट पोलीस अधीक्षकांवर तलवारीने हल्ला केला. मात्र एसपी प्रमोद शेवाळे (Nanded SP Pramod Shewale) यांच्यावर झालेला हल्ला त्यांचा अंगरक्षक दिनेश पांडे (Dinesh Pandey) यांनी आपल्या अंगावर घेतला. या हल्ल्यात दिनेश पांडे गंभीर जखमी असून रात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. (Nanded SP Pramod Shewales bodyguard Dinesh Pandey injured during gurudwara sikh halla bol Violence Maharashtra)

नांदेडमध्ये सध्या संचारबंदी लागू आहे, त्यामुळे होळीची पारंपारिक मिरवणूक काढू नये असे सर्वांच्या संमतीने ठरले होते, मात्र तरीही सांयकाळी काही युवकांनी पोलिसांचे बॅरिकेट तोडून ही मिरवणूक काढली. या मिरवणुकीत काही समाजकंटकांनी पोलिसांवर तलवारीने हल्ला केला. त्यात चार पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यासोबतच पोलिसांच्या काही वाहनांची तोडफोड करण्यात आली. यावेळी चित्रीकरण करणारे अनेक मोबाईलदेखील समाज कंटकांनी फोडून टाकले आहेत. पोलीस आता या समाजकंटकाचा शोध घेत असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सांगितलंय.

चार पोलिसांवर खासगी रुग्णालयात उपचार

नांदेडमध्ये जमावाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चारही पोलीस कर्मचाऱ्यांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापैकी एसपी यांच्या अंगावरचा वार आपल्या अंगावर घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर आहे. जखमीमध्ये नांदेड पोलीस दलाचे तीन कर्मचारी असून, एक जण राज्य राखीव पोलीस दलाचा कर्मचारी आहे. दरम्यान अनपेक्षितपणे आपल्यावर हल्ला झाल्याचे जखमी पोलिसांनी सांगितले.

400 जणांविरोधात गुन्हा दाखल

पोलिसांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी नांदेडमध्ये सुमारे 400 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत वीस जणांना अटक करण्यात आलीय, विशेष म्हणजे 60 आरोपीही निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आलं आहे. आरोपींची शोध मोहीम पोलिसांकडून सुरूच आहे. सध्या नांदेडमध्ये शांतता पसरली आहे.

नेमकं प्रकरणं काय?

नांदेडमध्ये दरवर्षी शीख समाजाकडून होळीनिमित्त होला मोहल्ला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र तरीही नांदेडमध्ये शीख समुदायाकडून जंगी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत प्रचंड गर्दी झाली होती. अनेकांनी मास्क देखील घातले नव्हते. या मिरवणुकीत कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात आले

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतर हा कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याने काही शीख तरुणांनी नांदेडमध्ये गोंधळ घातला. बॅरिकेड्स तोडून पोलिसांवर हल्ला केला. यात चार पोलीस कर्मचारी जखमी झाले. तसेच परिसरातील गाड्यांचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली.

नांदेडच्या गुरुद्वारा परिसरात पोलिसांवर हल्ला झाला. यात चार पोलीस कर्मचारी जखमी झाले. जमावाने पोलीस अधीक्षकांच्या वाहनावर हल्ला करत गाडीची तोडफोड केली. होळीच्या दिवशी गुरुद्वारातून हल्लाबोल मिरवणूक निघते. पण सध्या कोविडच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये संचार बंदी आणि लॉकडाऊन लागू आहे. तेव्हा गर्दी करू नये असे प्रशासनाचे आदेश होते. गुरुद्वारा बोर्डानेदेखील ही मिरवणूक रद्द केली. पण सायंकाळी हल्लाबोल मिरवणुकीसाठी मोठ्या संख्येने जमाव जमला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण जमावाने पोलिसांवर हल्ला केला. यात चार पोलीस कर्मचारी जखमी झाले.

VIDEO: नांदेडमध्ये नेमकं काय घडलं? 

संबंधित बातम्या 

नांदेडमध्ये शीख समुदायाकडून पोलिसांवर हल्ला, 20 जणांना अटक, तब्बल 400 जणांविरोधात गुन्हा दाखल