AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नंदूरबारमध्ये बर्ड फ्ल्यूची धास्ती… चिकन, अंड्याच्या विक्रीवर बंदी, पोल्ट्री व्यवसाय संकटात; प्रशासन सतर्क

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्ड फ्ल्यूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यामुळे पोल्ट्री व्यवसाय मोठ्या संकटात सापडला असून, चिकन आणि अंड्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. प्रशासनाने युद्धपातळीवर कारवाई करत लाखो कोंबड्या व अंडी नष्ट केली आहेत. या साथीमुळे हॉटेल व्यवसाय व संपूर्ण फूड चेनला मोठा आर्थिक फटका बसला आहे, तर प्रशासन पुढील संसर्ग रोखण्यासाठी सतर्क आहे.

नंदूरबारमध्ये बर्ड फ्ल्यूची धास्ती... चिकन, अंड्याच्या विक्रीवर बंदी, पोल्ट्री व्यवसाय संकटात; प्रशासन सतर्क
बर्ड फ्ल्यूची धास्ती
| Updated on: May 05, 2026 | 2:53 PM
Share

नंदूरबार जिल्ह्याला पुन्हा एकदा बर्ड फ्ल्यूचा विळखा पडला आहे. जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्ड फ्ल्यूमुळे पोल्ट्री व्यवसायच संकटात आला आहे. राज्याच्या इतर भागात बर्ड फ्ल्यूची लागण होऊ नये म्हणून प्रशासनाने युद्धपातळीवर काम सुरू केलं आहे. गेल्या दोन दिवसात पावणे दोन लाख कोंबड्या ठार मारून नष्ट करण्यात आल्या आहेत. तसेच 8 लाख अंडेही नष्ट करण्यात आले आहेत. या शिवाय नवापूर तालुक्यात चिकन आणि अंडीच्या विक्रीवर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे.

नवापूर तालुक्यात एकूण 38 पोल्ट्री फार्म आहेत. त्यापैकी 27 पोल्ट्री फार्म चालू आहेत. यात लाखो पक्षी आहेत. ज्या पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्ल्यू पसरला आहे, त्याच्या एक किलोमीटरच्या परिघातील पक्ष्यांना मारण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. दिवसाच नव्हे तर रात्री उशिरापर्यंत कोंबड्या मारण्याचे आणि अंडी नष्ट करण्याचे काम सुरू आहेत. एकट्या शनिवारीच 33 हजार कोंबड्या ठार करण्यात आल्या होत्या. नियमानुसार, पोल्ट्री फार्माशी संबंधित पक्षी, अंडी, पक्ष्यांच्या खाद्याचा स्टॉक, त्यांचे पंख आदी गोष्टी नष्ट केल्या जात आहेत. बर्ड फ्ल्यूचा संसर्ग रोखण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने कोंबड्या नष्ट केल्या जात आहेत.

100 हून अधिक कर्मचारी नियुक्त

पशुपालन विभागाने ही मोहीम राबवण्यासाठी 100 हून अधिक अधिकारी, कर्मचारी, पशु चिकित्सक आणि सहायक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. नाशिकवरूनही विशेषज्ञांची एक टीम नवापूरला आली आहे. तसेच नवापूरमधील संपूर्ण प्रभावित परिसर सील करण्यात आला आहे.

डिसइन्फेक्शन, निरीक्षण, सर्वेक्षण, रहादरी आणि देवाणघेवाण या सर्वांवर कठोर निर्बंध आणले गेले आहेत. प्रभावित परिसरातील एक किलोमीटरच्या आतील कोंबड्या मारण्याचे काम सुरू आहे. तर 10 किलोमीटर परिसरात सर्वेक्षणाचं काम सुरू करण्यात आलं आहे.

आधी धसका, मग निर्णय

नवापूर नगर परिषद प्रशासनाने तालुक्यातील अंडी, चिकन आणि बिर्याणीवर प्रतिबंध घातला आहे. त्याचा थेट परिणाम हॉटेल, चिकन सेंटर आणि अंडी विक्रेते तसेच किरकोळ विक्रेत्यांवर झाला आहे. बर्ड फ्ल्यूमुळे पोल्ट्रीच्यासोबतच फूड चेनलाही आर्थिक फटका बसला आहे.

19 वर्षातील तिसरा झटका

उत्तर महाराष्ट्रातील नवापूर तालुका हा पोल्ट्रीचा मोठा बेल्ट मानला जातो. गेल्या 19 वर्षात नवापूरमध्ये तिसऱ्यांदा बर्ड फ्ल्यूची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे पोल्ट्री उद्योगाला मोठा झटका बसला आहे. पहिल्यांदा 2006मध्ये तर दुसऱ्यांदा 2021 आणि आता 2026मध्ये बर्ड फ्ल्यू आल्याने पोल्ट्री व्यवसाय कोलमडण्याची शक्यता आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं