Nandurbar Police | बुलेटला आवाजवाला सायलेन्सर बसवताय? पोलीस उगारु शकतात कारवाईचा बडगा

बुलेट चालकांवर आजपासून नंदुरबार शहर वाहतूक शाखे तर्फे कारवाई करण्यात येणार आहे.

Nandurbar Police | बुलेटला आवाजवाला सायलेन्सर बसवताय? पोलीस उगारु शकतात कारवाईचा बडगा
Follow us
| Updated on: Dec 23, 2020 | 12:11 PM

नंदुरबार : कंपनीचे सायलेन्सर काढून ध्वनीप्रदूषण करणारे सायलेन्सर बसवणाऱ्या (Nandurbar Police Action On Noisy Bullet Riders) बुलेट चालकांवर आजपासून नंदुरबार शहर वाहतूक शाखे तर्फे कारवाई करण्यात येणार आहे. ज्या बुलेट वाहन धारकांनी कंपनीचे सायलेन्सर काढून प्रदूषण मुक्त सायलेन्सर बसवले असणार त्यांनी ते काढून कंपनीचे बसवून घेणे बंधनकारक आहे. ज्या बुलेटला असे ध्वनिप्रदूषण वाले सायलेन्सर आढळून येईल त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांनी दिले (Nandurbar Police Action On Noisy Bullet Riders).

नंदुरबार जिल्ह्यात अनेक महागड्या कंपनीच्या दुचाकी गाड्या आहेत. त्यामुळे ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत असतं. त्यामुळे वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यात येत आहे. ज्या मोटर सायकल त्या कंपनीचं सायलेन्सर नसून दुसऱ्या कंपनीचे ध्वनी प्रजुषण करणारं सायलेन्सर आहेत, अशा मोटरसायकलवर कारवाई केली जात आहे.

ज्या कंपनीच्या गाड्या आहेत त्याचं कंपनीचे सायलेन्सर वापरावा, असे आदेश वाहतूक शाखा नंदुरबार यांच्याकडून देण्यात येत आहे. जेणेकरुन ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण होणार नाही. त्यामुळे या वाहन मालकांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे यांच्यामध्ये एक मोठ्या प्रमाणात महसुल देखील होणार असल्याची माहिती दिली आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये नागरिकांकडून या कारवाईचं कौतुक देखील केलं जात आहे.

नागपुरात तीन हजार बुलेट चालकांवर कारवाई

यापूर्वी काही महिन्यांपूर्वी नागपुरातही बुलेट चालकांवर कारवाई करण्यात आली होती. जुलै महिन्यात कर्कश हॉर्न, मोठ्या आवाजाचा सायलेन्सर आणि फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या बुलेटवर नाहपूर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली होती. यावेळी 3 हजार पेक्षा जास्त बुलेटचालकांवर कारवाई करण्यात आली होती.

फॅन्सी नंबर प्लेट लावणे अवैध

मोटार वाहन कायदा-1988 आणि मोटार वाहन नियम-1989 नुसार वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावणे अवैध आहेत. तरीही शहरात असंख्य वाहनचालकांची भाईगिरी सुरू आहे. गुन्हेगारी कारवायांमध्ये वापरण्यात येणाऱ्या वाहनांची ओळख पटू नये म्हणून फॅन्सी नंबर प्लेट लावल्या जातात.

Nandurbar Police Action On Noisy Bullet Riders

संबंधित बातम्या

बुलेटला फॅन्सी नंबर प्लेट, पोलिसांकडून मोठा दंड, दंडाची रक्कम…

बहिणीकडून भावाला बुलेट भेट, बहिणींना देण्यासाठी काहीच नसल्याने भावाची आत्महत्या

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.