AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhondu Ashok Kharat : तो फोटो, मंदिर, भेट आणि… भोंदू ज्योतिषी कॅप्टन खरात रातोरात प्रसिद्ध कसा झाला?

राजकारणी आणि सेलिब्रिटींचे भविष्य सांगणारा स्वयंघोषित 'ज्योतिषी' अशोक खरात, उर्फ ​​कॅप्टन खरात, स्वतःचीच कुंडली वाचण्यात अयशस्वी ठरला. नाशिकमधील एका बलात्कार प्रकरणात त्याला अटक झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. गुन्हे शाखेच्या तपासात अनेक पुरावे समोर आले असून काही आक्षेपार्ह व्हिडीओ देखील सापडले आहेत.याप्रकरणात आता SIT तपास करत असून, या हाय-प्रोफाईल प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

Bhondu Ashok Kharat : तो फोटो, मंदिर, भेट आणि... भोंदू ज्योतिषी कॅप्टन खरात रातोरात प्रसिद्ध कसा झाला?
कॅप्टन खरात रातोरात प्रसिद्ध कसा झाला ?Image Credit source: social media
| Updated on: Mar 20, 2026 | 11:21 AM
Share

मोठमोठे राजकारणी, सेलिब्रिटींचेही भविष्य सांगण्याचा आणि ग्रह-ताऱ्यांच्या साहाय्याने लोकांचे नशीब बदलण्याचा दावा करणारा स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरात, आता स्वतःच चौकशीच्या फेऱ्यात अडकला आहे. नाशिकमध्ये अशोक खरात उर्फ ​​कॅप्टन खरात याच्या अटकेने केवळ राजकीय वर्तुळातच खळबळ उडालेली नाहीये, तर अशा तथाकथित “ज्योतिषांवर” आंधळेपणाने विश्वास ठेवणाऱ्यांनाही धक्का बसला आहे.

नाशिक क्राइम ब्रांचच्या युनिट 1 ने एका मोठ्या कारवाईत, अशोक खरात या स्वयंघोषित ज्योतिषाला अटक केली. एका 35 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पण अशोक खरात हा केवळ एक सामान्य ज्योतिषी नव्हता. तो स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवतो आणि अनेक प्रमुख राजकारणी, उद्योगपती आणि सेलिब्रिटींचे भविष्य वर्तवल्याचा दावा करत होता. महाराष्ट्रातील अनेक प्रभावशाली व्यक्ती त्याचा सल्ला घेत असत, असे म्हटले जाते. नोव्हेंबर 2022 मध्ये, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरगाव येथील एका मंदिराला भेट दिली आणि तिथे त्यांची कथितरित्या खरातशी भेट झाली, तेव्हा तो मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला. त्या भेटीनंतर त्याचे नाव झपाट्याने चर्चेत आले आणि त्याच्या प्रभावाच्या कथा पसरू लागल्या. पण आता हाच खरात अनेक आरोपांनी घेरला गेला आहे. इतरांची पत्रिका वाचणार खरात स्वतःच्याच आयुष्याची कुंडली वाचण्यात मात्र अयशस्वी ठरला

महिलेच्या तक्रारीने उघड झालं प्रकरण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 35 वर्षीय महिलेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि अशोक खरातवर बलात्काराचा आरोप करत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. मात्र हा तपास जसजसा पुढे सरकत गेला, तसतसे अनेक धागेदोरे पोलिसांना सापडले, ज्यामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झालं. यानंतर, गुन्हे शाखेने कारवाई करत आरोपी खरात याला अटक करण्याची योजना आखत त्याला बेड्या ठोकल्या. पोलीस अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून, पीडितेच्या आरोपांना पुष्टी देण्यासाठी अनेक पुरावे गोळा केले जात आहेत.

छाप्यात सापडले धक्कादायक पुरावे

मात्र पोलिसांनी आरोपीच्या विविध ठिकाणांवर छापे टाकल्यावर या प्रकरणातील सर्वात धक्कादायक खुलासा झाला. या छाप्यादरम्यान पोलिसांनी 58 अश्लील व्हिडिओ जप्त केले. हे व्हिडिओ काही प्रमुख महिला आणि सेलिब्रिटींशी संबंधित असू शकतात, असे म्हटले जाते. मात्र पोलिसांनी अद्याप अधिकृतपणे कोणतीही अधिक माहिती दिलेली नाही. या व्हिडिओंबाबतचा तपास सुरू असून, येत्या काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे समोर येण्याची भीती आहे.

मंदिर ट्रस्टशी निगडीत

अशोक खरात हा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातल्या मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष असल्याचेही बोलले जाते. या पदावर असल्यामुळे त्याला स्थानिक पातळीवर मोठा प्रभाव मिळाला आणि ‘आध्यात्मिक मार्गदर्शक’ म्हणून त्याची ख्याति पसरली. यामुळे सामान्य लोकांपासून ते प्रभावशाली व्यक्तींपर्यंत अनेकांशी त्याचा संबंध आला. अशोक खरात वादात सापडण्याची ही पहिली वेळ नाही. महाराष्ट्र अंधश्रद्धा विरोधी समितीच्या कार्यकर्त्यांनी यापूर्वीच त्यांच्या विरोधात मोहीम सुरू केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याची भेट घेतली, तेव्हा त्या भेटीमुळे मोठा वाद निर्माण झाला. अंधश्रद्धाविरोधी संघटनांनी या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अशा ‘बाबां’च्या प्रचारावर मोठा आक्षेप घेतला होता.

SIT कडून तपास सुरू, महिला अधिकारी करत्ये नेतृत्व

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, महाराष्ट्र सरकारने विशेष तपास पथकाकडे (SIT) याचा तरास सोपवला आहे. महिला आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते या पथकाचे नेतृत्व करत असून त्यांनी आरोपी अशोक खरात याची सुमारे दोन तास चौकशी केली अशी माहिती समोर आली आहे. मात्र, तपास पुढे सरकल्यावर माहिती दिली जाईल, असे सांगत त्यांनी अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी केले नाही. पीडितेचे आरोप, जप्त केलेले व्हिडिओ किंवा आरोपीचे संपर्काचे नेटवर्क या सर्व प्रकरणांची SITकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे. अशोक खरातला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असून त्याची सतत चौकशी सुरू आहे. या प्रकरणात जे काही तथ्य समोर येतील, त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितलं आहे. याशिवाय, जप्त केलेल्या व्हिडिओ आणि डिजिटल पुराव्यांची फॉरेंसिक तपासणी करण्यात येणार असून ते महत्त्वपूर्ण ठरेल.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी