Ashok Kharat Case : बुद्धी असलेल्या बायांना कळेल ना की एखाद्या पुरूषाचं मूत्र कसं काय प्यायचं? खरात प्रकरणावरून लेखिकेने ओढला आसूड

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे होत असताना, लेखिका अरुणा सबाने यांनी मोठी मागणी केली आहे. त्यांच्या मते, खरातसोबत स्वेच्छेने सहभागी झालेल्या महिलांवरही कारवाई व्हायला हवी. सबाने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र लिहीलं आहे.

Ashok Kharat Case : बुद्धी असलेल्या बायांना कळेल ना की एखाद्या पुरूषाचं मूत्र कसं काय प्यायचं? खरात प्रकरणावरून लेखिकेने ओढला आसूड
अशोक खरात केस
| Updated on: Apr 03, 2026 | 1:05 PM

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात केसमध्ये दिवसेंदिवस धक्कादायक खुलासे होत असून त्याच्या कारनाम्यांची बरीच माहिती उघड झाली आहे. सध्या एसआयटीकडून याप्रकरणाचा कसून तपास सुरू असून, खरातचा पाय आणखी खोलात चालला आहे. याचदरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे. अशोक खरातकडे स्वेछ्ने गेलेल्या महिलांवरही कारवाई करा अशी मागणी लेखिका अरूणा सबाने यांनी केली आहे. खरात प्रकरणी अरूणा सबाने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीलं आहे. व्हिडीओ आणि फोटोमध्ये महिलांना जबरदस्ती आणलंय असं वाटत नाही, महिलांना गुंगीचं औषध दिल्याचंही दिसत नाही, असं अरूणा सबाने यांनी म्हटलंय.

काय म्हणाल्या अरूणा सबाने ?

भोंदू लोक तर दोषी आहेतच, यात काही शंका नाही. अशोक खरात असो किंवा इतर कोणी बाबा लोक, ते सगळे लोक दोषी आहे. पण मी जे अनेक व्हिडीओ, फोटो पाहिलेत, त्याच्यामध्ये त्या स्त्रियांना जबरदस्तीने आणलंय, असं दिसत नाही. त्या हसत आहेत, त्यांचा चेहरा फ्रेश आहे. तो (खरात) जसंजसं म्हणतोय तसंतसं त्या करत आहेत, स्वेच्छेन वागत आहेत. आणि अत्यंत घाणेरड्या पातळीवर जाऊन त्यांचे जे लैंगिक चाळे दिसत आहेत. एखाद्या कुठल्याही शिकलेल्या, थोडी बुद्धी असलेल्या बाईला हे कळेल ना की एखाद्या पुरूषाचं मूत्र कसं काय प्यायचं? त्याच्यामुळे आपल्याला लैंगिक समाधान कसं मिळेल, किंवा मूल कसं होईल ? हा प्रश्न त्यांना पडेलच ना,  असा सवाल त्यांनी विचारला.

ज्या वेगवेगळ्या कारणांनी त्यांना बाया, अगदी राज्य महिला आयोगची अध्यक्ष ती त्याच्या (खरात) नादी लागली, प्रशासनातल्या, राजकारणातल्या स्त्रिया नादी लागल्या , पुरूष लागले. सामान्य अशी खेड्यातली एकही बाई मी त्या व्हिडीओमध्ये पाहिली नाही, ही जर का स्वत:ची सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेऊन या बाया जर वागत नसतील, तर त्यांना आळा घालणं आपलं काम आहे, अशी ठाम भूमिका अरूणा सबाने यांनी मांडली.

मुख्यमंत्र्याकडे मागणी काय ?

अशा गोष्टींना कुठेतरी आळा बसला पाहिजे, त्यासाठी, ज्या बाया या माणसाच्या मागे लागल्या आहेत, ज्या लैंगिक समाधान मिळवण्यासाठी स्वेच्छेने त्याच्याकडे गेल्या, त्या स्त्रियांनासुद्धा कडक शिक्षा झाली पाहिजे.  असं काही केलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो, हे  इतर बायांना कळेल, असंही त्या म्हणाल्या.

 

Follow Us